बॉलिवूड अभिनेता आणि राजकारणी राज बब्बर 69 वर्षांचे झाला आहे.23 जून, 1952 रोजी उत्तर प्रदेशातील तुंडला येथे जन्मलेल्या राज बब्बर ने 1975 (मध्ये नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी) मधून अभिनयाचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि चित्रपटांमद्ये प्रवेश केला. एका मुलाखतीदरम्यान राज बब्बरने सांगितले होते की,त्याला लहानपणापासूनच अभिनयाची आवड आहे आणि बहुतेकदा तो स्टेज शोमध्ये सहभागी होत असे.
समाजातील बंधने बाजूला ठेवून स्मिता पाटीलबरोबर राहण्याचे धैर्य दाखविणाऱ्या अशा व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे राज बब्बर. मग यासाठी राजवरही टीका केली गेली, परंतु त्याने त्याची कधीच पर्वा केली नाही. नंतर राजने स्मिता पाटीलशीही लग्न केले. स्मिता पाटीलच्या प्रेमसंबंधामुळे चर्चेत आलेला राज बब्बर ने दोन विवाह केले आहेत. त्याच्या पहिल्या पत्नीचे नाव नादिरा जहीर आहे. राज बब्बर व नादिरा यांना दोन मुले आहेत, आर्या बब्बर आणि जूही बब्बर.
13 डिसेंबर,1986 रोजी स्मिता पाटीलचे वयाच्या 31 व्या वर्षी निधन झाले. हिंदू धर्मानुसार, पहिली पत्नी असताना दुसरे लग्न करता येत नाही, परंतु राजने प्रथम पत्नी नादिराला घटस्फोट न देता स्मिता पाटीलशी लग्न केले. मुलाला जन्म दिल्यानंतर Complication झाल्यामुळे स्मिताचा मृत्यू झाला. तिची अंतिम विदाई झाली तेव्हा ती वधूप्रमाणे सजली गेली आणि तिची मेक-अप अभिनेत्रीच्या इच्छेनुसार बॉलिवूडमधील लोकप्रिय मेक-अप कलाकार दीपक सावंत ने केला होता.
स्मिता पाटीलच्या निधनानंतर मुलगा प्रतीकची राज बब्बरवर नाराजी इतकी वाढली होती की त्याने चिडचिडीमुळे बब्बर आडनाव आपल्या नावावरून काढून टाकले. एका मुलाखतीत बब्बर आडनाव हटविण्याबद्दल बोलतना प्रितीक म्हणाला होता की- मी माझ्या पालकांबद्दल बऱ्याच कथा ऐकल्या ज्यानी माझ्या मनात घर केले होते. वडिलांशी माझे संबंध विचित्र होते.
प्रितीक बब्बर च्या म्हणण्यानुसार मला फक्त माझ्या आईचा मुलगा व्हायचं आहे. तथापि, आता सर्व काही ठीक आहे. सावत्र आई (नादिरा बब्बर) आणि भावंडे (आर्य आणि जुही बब्बर) यांचे संबंध आता चांगले आहेत. काही वर्षानंतर आता प्रितीकची वडील राज बब्बर यांच्यावरची नाराजी संपली आहे आणि त्याने आपले पूर्ण नाव प्रीतिक बब्बर पुन्हा लिहायला सुरुवात केली आहे.
एनएसडीमधून पदवी मिळताच राज बब्बरला बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक मिळाला होता. 1980 मध्ये त्याचा पहिला चित्रपट ‘सौ दिन सास के’ हा होता. यानंतर राज बब्बरचे अनेक उत्तम चित्रपट आले आणि इंडस्ट्रीत यशस्वी अभिनेता म्हणून त्याची स्थापना केली. त्याच्या मोठ्या हिट चित्रपटात बीआर चोप्राच्या ‘निकाह’ चा समावेश आहे.
चित्रपटांसह राज बब्बर राजकारणातही सक्रिय आहे. 2004 मध्ये 14 व्या लोकसभा निवडणुकीत तो फिरोजाबादमधून समाजवादी पक्षाचा सदस्य म्हणून निवडून आला. समाजवादी पार्टीमधून निलंबित झाल्यानंतर 2006 मध्ये त्याने कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत गाझियाबादमधून कॉंग्रेसचे माजी प्रवक्ते राज बब्बर ने आपले नशीब आजमावले, पण जनतेने त्याला नकारले.