अगदी नव्या नवरी सारखी नटून मलायका पोहोचली आपल्या प्रियकराच्या घरी,हे होते कारण!!

अर्जुन कपूर 36 वर्षांचा झाला आहे. 26 जून 1985 रोजी मुंबई येथे जन्मलेल्या अर्जुन कपूरने 2012 मध्ये आलेल्या इशाकजादे या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअरच्या सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पणासाठी नामांकन देण्यात आले होते. तसेच, अर्जुन कपूर आपल्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यासाठी चर्चेत असतो.

सोनम कपूरच्या वाढदिवशी मलायका अर्जुन कपूरच्या कुटूंबाला भेटण्यासाठी वधुसारखी वेषभूषा करून आली होती. मलायका अरोराचं नाव अर्जुन कपूरशी संबंधित असल्यापासून प्रत्येकजणला त्यांचे लग्न लवकर व्हावे असे वाटत आहे. काही वर्षांपूर्वी सोनम कपूरच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात मलायका कपूर कुटुंबाला भेटण्यासाठी वधुसारखी वेषभूषा करून आली होती.

यादरम्यान मलायका ने पार्टी थीमपासून दूर जाऊन स्वत: ला वेगळ्या स्टाईलमध्ये सजवले होते. पार्टीमध्ये मलायका डिझाइनर रोहित बालने डिझाइन केलेल्या व्हाइट आणि गोल्डन साडीमध्ये दिसली होती. इतकेच नाही तर या साडीचे सौंदर्य वाढवण्याचे काम बॉटकॅट स्लीव्ह बॅकलेस ब्लाउजने केले होते. यासह मलायकाने हलका मेकअप, हेवी हायलाईटर आणि स्टेटमेंट ज्वेलरीसह तिचा लुक पूर्ण केला होता.

बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय लव्हबर्ड्सपैकी एक म्हणजेच मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर काही दिवसांपूर्वी दोघेही कोरोना पॉझिटिव्ह आले होते. मात्र, आता कोरोनाला पराभूत करून हे जोडपे पूर्णपणे बरे झाले आहेत. दोन वर्षांपूर्वी अर्जुन आणि मलायका यांनी आपलं नातं अधिकृत केलं आहे. तसेच या दोघांनीही एकमेकांचा हात धरून एक फोटो शेअर केला होता, त्या दिवशी अर्जुन कपूरचा वाढदिवसही होता.

मलायकाने करण जोहरच्या चॅट शो ‘कॉफी विथ करण’ वर कबुली दिली होती की ती अर्जुन कपूरला पसंत करते. तसेच ते दोघेही सोशल मीडियावर एकमेकांचे कौतुक करतानाही दिसतात. मलायका अर्जुन कपूरपेक्षा 12 वर्षांनी मोठी आहे. काही महिन्यांपूर्वी जेव्हा एका चाहत्याने अर्जुन कपूरला त्याच्या लग्नाबद्दल विचारले होते, तेव्हा त्याला अभिनेत्याने म्हटले होते की – मी लग्न करेन तेव्हा तुला सर्व काही सांगेन.

स्वत: च्या लव्ह लाइफविषयी बोलताना मलायका एका मुलाखतीत म्हणाली होती की, प्रत्येकाला पुन्हा प्रेमात पडायचे आहे, नात्यात पडायचे आहे. कोणालाही एकटे राहण्याची आणि संपूर्ण आयुष्याची अविवाहित राहण्याची इच्छा नाहीये. लग्नाच्या 19 वर्षानंतर मलायकाने अरबाजशी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आणि मे 2017 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे की मलायका अरबाजच्या सट्टेबाजीच्या सवयीने वैतागली होती. म्हणूनच तिने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published.