अभिनेता अमिताभ बच्चन आणि रेखा यांचा हा सीन पाहून रडल्या होत्या जया बच्चन !!

चाहत्यांना अमिताभ यांची जोडी रेखा यांच्या सोबत चांगली वाटत होती पण,बॉलिवूड चे शहंशाह अमिताभ बच्चन आणि हिट अभिनेत्री जया बच्चन यांची जोडी ही सिनेसृष्टीतील यशस्वी जोडप्यांपैकी एक मानली जाते. 3 जून 1973 मध्ये अमिताभ आणि जया यांनी लग्न केले आणि आज ह्या लग्नाला 47 वर्षे पूर्ण झाली आहेत.

जसे की प्रत्येक पती पत्नी च्या नातेसंबंधात काही आंबट गोड क्षण येतात तसेच ह्या जोडीने पण अश्याच प्रेम व मजा – मस्तीत आपले जीवन व्यतीत केले आहे. आज पण ह्या जोडीला टक्कर देणारी बॉलिवूड मध्ये कोणतीच दुसरी जोडी दिसत नाही.

तथापि ह्यांच्या प्रेम – परिपूर्ण नात्यात एक वेळ अशी आली होती की जेव्हा वाटले होते की हे नात यापुढे टिकणार नाही. हा किस्सा रेखा यांच्याशी संबंधीत होता आणि याचा खुलासा स्वतः रेखा यांनी एका मुलाखतीत केला होता.

अमिताभ बच्चन आणि जया यांचे लग्न घाई घाईत झाले होते. पण दोघांमध्ये प्रेम हे आधीच झाले होते. खरतर जंजीर या चित्रपटात दोघांनी सोबतच काम केलं होते. हा चित्रपट पडद्यावर जबरदस्त हिट झाला होता आणि अमिताभ हे एका रात्रीत सुपरस्टार बनले गेले होते. त्याच वेळी जया बच्चन ह्या सुद्धा हिट अभिनेत्री झाल्या होत्या.

अमिताभ यांना जया यांच्यासोबत लंडन ला फिरायला जायचे होते, परंतु त्याचे वडील हरिवंशराय बच्चन यांनी त्यास नकार दिला. वडील हरिवंश राय यांची अशी इच्छा होती की अमिताभ यांनी जया यांच्याशी आधी लग्न करावे मगच फिरायला जावे.

दोघे पण एकमेकांना आवडत होते म्हणून त्यांनी लग्न केले. त्यानंतर अमिताभ आणि जया फिरायला लंडन ला गेले. अमिताभ हे पडद्यावर हिट अभिनेते बनत होते आणि जया ह्या सुद्धा हिट चित्रपटात काम करत होत्या तेव्हा त्यांच्या जीवनात आली रेखा.

रेखा यांनी अमिताभ सोबत चित्रपट ‘ दो अनजाने ‘ मध्ये पहिल्यांदाच काम केले होते. या चित्रपटाच्या नंतर पासूनच रेखा यांना वाटू लागले की आपला अमिताभ यांच्याशी काही तरी संबंध आहे. दोघांची जोडी खूप चित्रपटात जमली आणि ही जोडी सुपरहिटही ठरली.

चाहत्यांना अमिताभ यांच्यासोबत रेखा यांची जोडीच चांगली वाटत होती. अश्या परिस्थितीत सगळे दिग्दर्शकांना ही रेखा आणि अमिताभ यांनाच एकत्र चित्रपटात घेऊन काम करावे असे वाटत होते. तथापि जया बच्चन यांना अमिताभ आणि रेखा यांची जवळीक पसंत नव्हती.

एका मुलाखतीत रेखा यांनी त्या किस्स्याचा उल्लेख केला होता. रेखा यांनी असे सांगितले होते की ही गोष्ट ‘ मुक्कदर का सिकंदर ‘ च्या स्क्रिनिंगच्या वेळेची होती. मी त्या वेळेस प्रोजेक्शन च्या खोलीत होते. पहिल्या रांगेत अमिताभ हे आपल्या पत्नी व मुलांसमवेत बसले होते.

जेव्हा चित्रपटात माझा आणि अमिताभ याचा प्रेमाचा सीन आला तर जया ह्या स्वतः वर नियंत्रण नाही ठेऊ शकल्या आणि रडायला लागल्या. या चित्रपटानंतरच बरेच दिग्दर्शक मला म्हणायला लागले की जया ने मला अश्या कोणत्याच चित्रपटात घ्यायला नाही सांगितले की ज्यामध्ये अमिताभ हे अभिनेते असतील.

अमिताभ सोबत पडद्यावर रोमा न्स करता करता त्यांच्या जवळ चालल्या गेले होते. जया यांना जेव्हा असे वाटू लागले की त्यांचे लग्न हे धोक्यात आहे तर मग त्यांनी कठोर पावले उचलायला सुरुवात केली होती. एका मुलाखतीत रेखाने सांगितले होते की मी जया यांना काही काळ आधी चांगली स्त्री समजत होते.

मी त्यांना माझ्या बहिणी सारखे मानत होते. त्या पण माझ्या जवळच्याच होत्या. तथापि जेव्हा मला समजले की त्यांचे हे सारे सल्ले हे त्यांच्या स्वतः च्या फायद्यासाठी आहे तर मला धक्काच बसला होता. एकाच जागी राहत असलो तरीही त्यांनी मला त्यांचा लग्नात बोलावले नव्हते.

आता ह्या सगळ्या गोष्टीला खूप मोठा काळ सरून गेला आहे, परंतु परिस्थिती अजूनही तशीच आहे. अमिताभ आणि जया ह्याचा रेखा यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही आहे आणि रेखा पण त्यांच्याशी काहीच संबंध ठेवत नाही आहेत.

मात्र अमिताभ आणि जया यांची सून ऐश्वर्या ही रेखा यांना आई म्हणून बोलावते. अमिताभ यांच्या आयुष्यात कोणी आहे तर त्या फक्त जया. तथापि 47 व्या लग्नाचा वाढदिवस साजरा करायला ते दोघे एकत्र नाही आहेत.अमिताभ इकडे अभिषेक व ऐश्वर्या यांच्या सोबत मुंबई मध्ये आहेत तर तिकडे जया बच्चन ह्या दिल्ली मध्ये अडकलेल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.