शेवटी शेतकऱ्यांची पोरं!!कोरोनाने वडिलांच्या निधनानंतर घर चालवण्यासाठी ही अभिनेत्री करतेय शेती,’जगणं सोडता येत नाही’असे म्हणत केली पोस्ट..

अभिनेत्री अश्विनी महांगडे हिच्या वडिलांचे मंगळवारी १८ मे रोजी निधन झाले. अश्विनीचे वडील प्रदीपकुमार महांगडे यांना करोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. हे उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते.

तिच्या वडिलांच्या निधनानंतर तिनं त्यांच्या पसरणी या गावी शेतीची जबाबदारी घ्यायचं ठरवलं असून सध्याच्या पावसाळी वातावरणात ती वेचणी, पेरणी अशी महत्त्वाची कामं करताना दिसतेय. ‘काहीही संकट आलं तरी जगणं सोडता येत नाही. संकटावर मात करून पुढे चालत राहाणं तेवढं महत्त्वाचं असतं’, असं ती म्हणते.”

अश्विनी महांगडेने शेतात काम करतानाचे आपले फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘शेतकऱ्याची लेक आहे, जगणं सोडता येत नाही आणि लढणं थांबवता येत नाही. काही आठवणी जबाबदारीची जाणीव करून देत असतात त्यातलीच एक हळदीची लागवड व भुईंमुंग काढणी.

नानांचे हळदीवर विशेष प्रेम असायचे. नाना सोबत असल्याची जाणीव मला प्रत्येक गोष्ट करून देत असते. आयुष्यात टाकेल तिथे व येईल त्या परिस्थितीचा सामना करता आला पाहीजे. हीच नानांची प्रेरणा व शिकवण.’

Leave a Reply

Your email address will not be published.