बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानप्रमाणेच त्याची मुलेही चर्चेत आहेत. त्याची मुलगी सुहाना बरीच चर्चेत आहे. सुहाना सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे. आणि तिने आपला 21 वा वाढदिवस साजरा केला आहे. रविवारी सुहानाने आपला वाढदिवस अतिशय मजेदार पद्धतीने साजरा केला. सुहाना खानच्या बर्थडे पार्टीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
वाढदिवसाच्या सेलिब्रेशनपूर्वी शाहरुख खानची मुलगी सुहाना खान व्हिडिओमध्ये एका वेगळ्या स्टाईलमध्ये दिसली आहे. व्हिडिओमध्ये सुहाना खान खूपच सुंदर दिसत आहे. ती खुप मजेदार स्टाईलमध्ये दिसली आहे. चाहते या व्हिडिओचे खूप कौतुक करीत आहेत. या व्हिडिओमध्ये सुहा एका क्यूट पद्धतीने बलूनसह खेळताना दिसत आहे.
सुहाना खान शॉर्ट ड्रेसमध्ये जमिनीवर बसून बलून सोबत खेळत आहे. तिने मिडी ग्रीन शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे.मिनिमम मेकअप लूकमुळे सुहानाने आपल्या चाहत्यांना हैराण केले आहे. हा व्हिडिओ एका सेलिब्रिटी छायाचित्रकाराने पोस्ट केला आहे. बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानची लाडकी मुलगी सुहाना खान अद्याप चित्रपटांमध्ये दिसली नाही आणि तिच्या चाहत्यांची संख्या सतत वाढवत आहे.
अनलॉक होताच सुहानात तिच्या अभ्यासासाठी न्यूयॉर्कला परत आली आहे आणि तिथूनच ति चाहत्यांना अपडेट्स देत राहते. सुहाना खानने अलीकडेच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर स्वत: चे एक चित्र शेअर केले आहे, ज्यामुळे चाहतेही घायाळ झाले आहेत. चित्रात सुहानाने ब्लॅक कलरचा ड्रेस परिधान केला आहे. आणि तिने तिच्या कंबरेभोवती एक बेल्ट लावला आहे. या लूकसह सुहानाने सोन्याची चैन, कानातले आणि हलका मेकअप केला आहे.