मित्रांनो, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी निवृत्तीनंतर दुग्धशाळेसह सेंद्रिय शेतीची कामे करीत आहे. धोनी रांचीच्या धुर्वा येथे 55 एकरात शेती करीत आहे, तेथे दुग्धशाळेसह सेंद्रिय शेती केली जात आहे. सध्या धोनीच्या फार्म हाऊसमध्ये फक्त हंगामी भाजीपाला तयार केला जात आहे. सध्या त्याच्या फार्म हाऊसमध्ये टोमॅटो, फुलकोबी, कोबी, ब्रोकोलीची लागवड केली असून, त्यातआता टोमॅटोचे उत्पादन घेतले आहे.
धोनीच्या फार्म हाऊसमध्ये दररोज 80 किलो टोमॅटो तोडले जात आहेत. याची बाजारात खूप मागणी आहे आणि सकाळीच सर्व टोमॅटो विकली जात आहेत. टोमॅटोचे संपूर्ण उत्पादन सेंद्रिय स्वरूपात केले जात आहे. येत्या एका आठवड्यात रांचीतील लोक धोनीच्या फार्म हाऊसने तयार केलेल्या कोबीची चव चाखू शकतील. सध्या धोनीच्या शेतातले टोमॅटो 40 रुपये प्रतिकिलो असे विकले जात आहेत.
त्याचबरोबर धोनीच्या फार्म हाऊसमध्ये दररोज सुमारे 300 लीटर दुधाचे उत्पादन होत असून त्याचे दूध थेट बाजारात विकले जात आहे. दुधाची किंमत प्रति किलो 55 रुपये ठेवली गेली आहे, व ते काही तासांत विकले जाते. धोनीने भारतीय जातीची सहिवाल आणि फ्रेंच जातीची फ्रीजियन गाई पाळल्या आहेत. सध्या धोनीच्या गौशालामध्ये 70 गायी आहेत. व या सर्व गाई पंजाबमधून आणल्या गेलेल्या आहेत.
शिवनंदन आणि त्याची पत्नी सुमन यादव हे धोनीच्या फार्म हाऊसची देखरेख करतात. संपूर्ण भाजीपाल्याचा कारोबार त्यांच्यावर आहे. शिवनंदन ने सांगितले आहे की, आतापर्यंत त्याने धोनीच्या खात्यात लाखो रुपये टाकले आहेत. धोनी आपल्या फार्म हाऊस ने तयार केलेल्या भाज्यांमुळे आणि डेअरी फार्म मुळे खूप आनंदित आहे.
शिवानंदन ने आज तक सांगितले आहे की, धोनी जेव्हा जेव्हा रांचीमध्ये राहतो, तेव्हा तो दर दोन-तीन दिवसांनी आपले फार्म हाऊस पाहण्यासाठी नक्कीच येतो. तो म्हणाला की ज्या पद्धतीने सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला उत्पादित केला जात आहे, हे पाहून धोनी खूप खूश आहे. भाजीपाला आणि दूध विकून जे पैसे मिळतात ते थेट धोनीच्या बँक खात्यात जमा होतात. धोनी डेअरी फार्ममध्ये असलेल्या गायीजवळ काही क्षणही घालवतो.