मित्रांनो, टीव्हीच्या लोकप्रिय कार्यक्रम ‘तारक मेहता का उलटा चश्मा शो’ मध्ये एकापेक्षा जास्त व्यक्तिरेखा आहेत, ज्या लोक खूपच पसंत करतात, त्यातील एक म्हणजे बाघाची व्यक्तिरेखा देखील लोकांना खूप आवडली आहे, पण या भूमिकेत असलेला अभिनेता आज त्याच्याकडे कोटींची संपत्ती आहे. ज्याचे नाव तन्मय वेकारिया आहे.
तन्मयने 2017 मध्ये एका गुजराती चित्रपटात देखील काम केले आहे. टीव्हीशो तारक मेहता का उलटा चश्मा च्या दर्शकांना हे माहित असेलच की शोचे पात्र बाघा कधीही सरळ उभा राहू शकत नाही. त्याचे पोट पुढे आलेलं आहे, आणि शरीराचा वरचा भाग मागच्या दिशेने आहे, आणि तो वाकडा उभा राहतो.
बाघाचे हे अतिशय आव्हानात्मक पात्र तन्मय वेकारियाने साकारले आहे. तन्मयच्या या व्यक्तिरेखेला इतर पात्रांप्रमाणेच बरीच प्रसिद्धी मिळाली असून त्यानं बरीच कमाई केली आहे.तन्मय वेकारिया अभिनय करण्यापूर्वी एका बँकेत नोकरी करत असे, जिथे त्याला मासिक पगारा 4000 इतका मिळायचा. पण अभिनयामध्ये उतरल्यानंतर आणि तारक मेहता शोमध्ये सामील झाल्यानंतर तन्मयकडे आता कोटींची संपत्ती आहे.
‘चाईल्ड 2 स्टार’ या यूट्यूब चॅनलनुसार तन्मयची संपत्ती 3 कोटी इतकी आहे. त्याने गुजराती चित्रपटात देखील काम केले आहे – 2008 पासून म्हणजे शोच्या सुरूवातीपासून तन्मय वेकरिया तारक मेहता शोशी संबंधित आहे. पण त्यादरम्यान, 2017 मध्ये त्याने समय चक्र टाइम स्लॉट या गुजराती चित्रपटात देखील महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. तारक मेहता शोशिवाय … तन्मयने ‘धुंडते रे रहोगे’ या शोमध्ये देखील काम केले आहे.
तारक मेहता शोसाठी तन्मय वेकारियाला एक बरी रक्कम दिली जाते. त्याला एका दिवसासाठी 22,000 रुपये फी दिली जाते. माध्यमांच्या वृत्तानुसार, तन्मय वेकरियाकडेही होंडा सिटी सारखी वाहने आहेत. या कार्यक्रमात जेठालालची भूमिका करणारा दिलीप जोशी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत म्हणाला होता की, तन्मयला या भूमिकेमुळे आधी पाठीच्या काही समस्या येत असत पण नंतर त्याने याकडे लक्ष द्यायला सुरवात केली, त्यानंतर त्याला परत समस्या आल्या नाहीत. “