लॉकडाउनमुळे या प्रसिद्ध अभिनेत्री वर आले असे दिवस अ‍ॅक्टिंग सोडून कन्स्ट्रक्शन साइटवर दगड फोडताना दिसली…

कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या लॉकडाऊनमुळे सामान्य, तसेच बरेच लोक बेरोजगार झाले आहेत. टीव्ही आणि चित्रपटातील कलाकारांनीही बेरोजगारीची व्यथा व्यक्त केली आहे. छोट्या पडद्यावरील कॉमेडी सीरियल ‘भाबीजी घर पर हैं! मधील शिल्पा शिंदे अभिनय सोडून बांधकाम साइटवर काम करताना दिसली.

शिल्पा शिंदे ने ‘भाभीजी घर पर हैं!’ या टीव्ही मालिकेत अंगुरी भाभीची व्यक्तिरेखा साकारली होती, जी प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती आणि तिला या पात्रातून वेगळी ओळखही मिळाली आहे. शिल्पा शिंदेने स्वत: चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती कंस्ट्रक्शन साइट वर ड्रिलिंग मशीन ने दगड फोडताना दिसत आहे.

बांधकाम साइटवर दगड फोडताना शिल्पा शिंदेने स्वत: चा व्हिडिओ अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती एका बांधकाम साइटवर ड्रिलिंग मशीन चालवताना दिसत आहे. तीच्या डोक्यावर टोपी देखील आहे आणि तीने कुर्ता घातला आहे. तिचा हा व्हिडिओ शेअर करताना शिल्पा शिंदे ने एक खास पोस्टही लिहिले आहे, ज्याची बरीच चर्चा होत आहे.

शिल्पा शिंदे ने पिक्चर पोस्टमध्ये लिहिले की, ‘जेव्हा लॉकडाऊन झाला तेव्हापासून मी बांधकाम क्षेत्रात गेले आहे. ज्यांच्याकडे अद्याप काम नाही ते आपले क्षेत्र बदलू शकतात. कालांतराने सर्व काही ठीक होईल. फक्त सकारात्मक राहा’ शिल्पा शिंदे ची पोस्ट आणि सोशल मीडियावरील हा व्हिडियो सद्या खुप व्हायरल होत आहेत.

शिल्पा शिंदे टीव्ही जगाचा एक लोकप्रिय चेहरा आहे. तीने ‘कभी आए ना जुदाई’, ‘मिस इंडिया’, ‘मेहर-कहानी हक और हकीकत की’,’संजीवनी’, ‘रब्बा इश्क ना होवे’, ‘हरी मिर्ची लाल मिर्ची’ ‘बेटियां अपना या पराया धन’ आणि ‘वारिस” अशा अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे’. या व्यतिरिक्त तिने ‘पटेल की पंजाबी शादी’ या चित्रपटात तिने एक आइटम सॉन्ग केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.