शाहरुख खानचा छोटा मुलगा अबराम खान 8 वर्षांचा झााला आहे. अब्रामचा जन्म 27 मे 2013 रोजी मुंबई येथे झाला होता. शाहरुखला तीन मुले आहेत आणि अब्राम सर्वात धाकटा आहे, ज्याचा जन्म सरोगसीद्वारे झाला. पण तुम्हाला माहित आहे का शाहरुख आधी दोन मुलांचा पिता असूनही तिसर्या मुलाची कल्पना का केली? 2013 मध्ये अब्रामच्या जन्मानंतर स्वत: शाहरुखने एका मुलाखतीत हा खुलासा केला होता.
अब्रामच्या घरात म्हातारा माणूस नाही आणि त्याला घरी अशा व्यक्तीची आठवण येते. व तो बिग बीला आपले आजोबा मानतो असे शाहरुखनेच स्वतः उघड केले होते. 2017 मध्ये, अमिताभ ने आराध्याच्या वाढदिवशी काढलेल्या अब्रामच्या फोटोविषयी लिहिले होते की – ‘अब्रामला बुढ्ढी के बाल’ घ्यायचे होते. आम्ही त्याला स्टॉलवर नेले आणि त्याला ते दिले.
2018 मध्ये अब्राम पुन्हा आराध्याच्या वाढदिवसा निमित्त गेला होता, तेव्हा बिग बीने त्यांच्याशी हातमिळवणी केली. बिग बी बरोबर हात मिळवत असताना अब्राम त्याच्याकडे मनात प्रश्नां असलेेेल्या पद्धतीने पहात होता. इंस्टाग्रामवर फोटो शेअर करताना अमिताभने लिहिलेे होते की- ‘शाहरुख खानचा छोटा मुलगा अबरामला खात्री आहे की मी शाहरुख खानचा पिता आहेे आणि त्याचा आजोबा आहे.
खरं तर अब्रामला आजोबांचं प्रेम कधीच मिळालं नाही. शाहरुखचे वडील मीर ताज मोहम्मद खान यांचे 1981 मध्ये कर्करोगाने निधन झाले होते. त्यावेळी शाहरुख अवघ्या 16 वर्षांचा होता. वडील गेल्यानंतर आईला हा धक्का सहन करता आला नाही आणि तीही निधन पावली. यानंतर त्याची मोठी बहीण शहनाझही डिप्रेशनमध्ये गेली.
अब्रामच्या जन्माच्या वेळी शाहरुखने एका मुलाखतीत सांगितलेे होते की- मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. पण ते घराबाहेर अधिक राहू लागले, शाळेत जाऊ लागले. पूर्वी मी त्याच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवायचो. परंतु गेल्या काही वर्षांपासून वातावरण असे झाले आहे की मुले आपल्या मित्रांसह त्यांच्या खोल्यांमध्ये. असतात. कधीकधी ते घरात आहेत की नाही हे देखील माहिती नसते.
असे म्हटले जाते की अब्रामच्या जन्माच्या वेळी गौरीने वयाची 40 वर्षी ओलांडली होती, आणि या वयातच बाळला जन्म देणे धोकादायक ठरू शकते. म्हणूनच शाहरुखने मुलाच्या जन्मासाठी सरोगसीचा सहारा घेतला होता. अबरामला मीडिया फोटोग्राफर अजिबात आवडत नाही. जर कोणी त्याचे फोटो क्लिक केले तर त्याला खूप राग येतो.