चित्रपटातील तारे आपल्या प्रत्येक गोष्टीसाठी प्रसिद्धीमध्ये येतात. चित्रपट, अभिनेत्री, फॅशन, कुटुंब आणि त्यांच्याशी संबंधित प्रत्येक गोष्ट चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनलेला असतो. दुसरीकडे बॉलिवूडमधील अनेक स्टार्सचे विवाह किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी संबंधित कोणतेही विवाहदेखील बर्याचदा चर्चेत असतात. त्याच वेळी, बॉलिवूडशी संबंधित बर्याच विवाहसोहळ्यांमध्ये पीएम मोदींनी नवविवाहित जोडप्याला आपली हजेरी लाऊन आशीर्वाद दिला आहे.
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली…
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचे लग्न खूप चर्चेत आले होते. या दोघांनी डिसेंबर 2017 मध्ये इटलीमध्ये सीक्रेट वेडिंग केली होती, तथापि, भारतात पोहोचल्यानंतर या जोडप्याने ग्रैंड रिसेप्शन दिले होते. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही हे आमंत्रण दिले होते. पीएम मोदी या प्रसिद्ध लग्नात पोहोचले आणि लग्नाची सुंदरता वाढविली. तसेच पंतप्रधानांनी विराट-अनुष्काला आशीर्वाद दिला.
अहाना देओल आणि वैभव वोरा…
भारतीय जनता पक्षाच्या खासदार आणि त्यांच्या काळातील प्रसिद्ध आणि सुंदर अभिनेत्री हेमा मालिनी यांनीही त्यांची छोटी मुलगी अहाना देओल यांच्या लग्नासाठी पंतप्रधान मोदींना आमंत्रण दिले होते. सन 2014 मध्ये, ज्या वर्षी पंतप्रधान मोदी प्रथमच पंतप्रधान झाले होते, त्याच वर्षी अहानाने वैभव वोराशी लग्न केले होते. पंतप्रधानही या लग्नात पोहोचले आणि नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद दिला.
प्रियंका चोप्रा आणि निक जोनास…
बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंत जगात नाव कोरलेली सुप्रसिद्ध आणि सुंदर अभिनेत्री प्रियंका चोप्राने वर्ष 2018 मध्ये अमेरिकन गायक निक जोनासशी लग्न केले आहे. प्रियंका चोप्रा नेही पीएम मोदींना तिच्या लग्नाच्या ग्रैंड रिसेप्शन मद्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रण पाठवले होते. पंतप्रधान लग्नात पोहोचले आणि नवविवाहित जोडप्याला आशीर्वादही दिला होता. निक आणि प्रियांकाने दिल्लीमध्ये लग्नाचे भव्य रिसेप्शन ठेवले होते.
शत्रुघ्न सिन्हाचा मुलगा व कुश यांचा विवाह…
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ शत्रुघ्न सिन्हा ने कुश सिन्हाच्या लग्नासाठी पंतप्रधान मोदींना आमंत्रण पाठवले होते. 2015 मध्ये शत्रुघ्न सिन्हाचा मुलगा कुशचा विवाह तरूणा सिन्हाशी झाला होता. शत्रुघ्न च्या आवाहनावरून पीएम मोदींनी या लग्नाला हजेरी लावली आणि नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद दिला होता.
हरभजन सिंग आणि गीता बसरा…
भारताच्या दिग्गज गोलंदाजांच्या यादीत समावेश असलेल्या हरभजन सिंगने 2015 साली गीता बसराशी लग्न केले होते. दोघांच्या लग्नाचे रिसेप्शन दिल्ली येथे होते. पीएम मोदीही यात सहभागी झाले होते.
कॉंग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांचा मुलाचे लग्न…
कॉंग्रेसचे नेते अभिषेक मनु सिंघवी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांचा मुलगा आविष्कार सिंघवीच्या लग्नात येण्यासाठी आमंत्रित केले होते. या लग्नात अनेक बड्या सेलिब्रिटींचा सहभाग होता, परंतु पीएम मोदी हे आकर्षणाचे केंद्र बनले होते. आविष्कर सिंघवीचे 2015 साली लग्न झाले होते. दिल्लीत या लग्नाचे भव्य रिसेप्शन ठेवले होते.