अनु अग्रवाल चे नाव लक्षात येताच ‘आशिकी’ हा चित्रपट प्रथम लक्षात येतो. आशिकी हिट ठरल्यानंतर तीला हॉलिवूड तसेच साउथकडूनही ऑफर आल्या, पण 1999 मध्ये एका अपघाताने तिचे पूर्ण आयुष्य बदलुन गेेले. ती कोमात गेली होती. त्यानंतर अनुने आयुष्याशी लढा दिला आणि जेव्हा ती कोमामधून बाहेर पडली तेव्हा तिने पुन्हा बॉलिवूडमध्ये जाण्याऐवजी एल्फ आणि लेखिका होण्याचा निर्णय घेतला.
2015 मध्ये अनुने तिचे बायोग्राफी अनयूजवल: मेमोइर ऑफ ए गर्ल हू केम बैक फ्रॉम डेड लिहिलं. अलीकडेच तिने तीचे ऑडिओबुकही लाँच केले आहे. दरम्यान, नुकताच अनु अग्रवालने एका मुलाखती दरम्यान चित्रपट, प्रसिद्धी आणि आयुष्यातील बदल याबद्दल बोलले आहे.
तिने मुलाखतीदरम्यान सांगितले की- मी जानेवारीपासून आशिकीची शूटिंग सुरू केली आणि मी अभिनय करण्यास सुरुवात केली तेव्हा माझे मन बदलले होते. मला पुन्हा मॉडेलिंगमध्ये जायचे नव्हते. पण आशिकी नंतर माझं आयुष्य बदललं. मी एका रात्रीत स्टार बनले होते.
आशिकीच्या यशानंतर, लोकांकडून मला असं प्रेम मिळालं यावर माझा विश्वास बसत नव्हता. जेव्हा मी बाहेर पडायचे तेव्हा चाहते येऊन माझे ऑटोग्राफ घेत असत. एवढेच नाही तर लोक माझी एक झलक पाहाण्यासाठी घराबाहेर उभे राहत असत.
ती म्हणाली- मी स्टारडम साठी अजिबात तयार नव्हते. स्टारडमवर कशी प्रतिक्रिया करावी हे मला माहित नव्हते. मी अभिनेता होण्याचे स्वप्न कधीच पाहिले नव्हते. मी नेहमीच सामाजिक कार्यकर्ता होतेेआणि माझे स्वप्न होते की संयुक्त राष्ट्रात काम करावे.
अनुने सांगितले की- आशिकी नंतर मला राकेश रोशन आणि मणिरत्नम चा फोन आला. मला हॉलिवूड चित्रपटातही ऑफर मिळाली होती. माझ्या हातात काही चांगले प्रकल्प होते, परंतु मला नेहमी आधी स्क्रिप्ट वाचायचे होते.
अनूने अपघाताचे दिवस आठवले आणि म्हणाली की- मी माझ्या आयुष्यातील एका अतिशय कठीण अवस्थेतून गेले आहे, जे की खूप कठीण होते. जिथे आजारपण होते, त्रास होत होता आणि काहीही बरे नव्हते. तथापि, कधी ना कधी अशा कठीण परिस्थितींचा सामना करावा लागतो. अशा वेळी तुम्ही मेडिटेशन करावे अशी माझी इच्छा आहे.
या भीषण अ’पघा’तानंतर अनु ग्लैमर वर्ल्डपासून दूर झोपडपट्टीतील गरीब मुलांना विनामूल्य योगा शिकवते. ती अखेर एप्रिल 2018 मध्ये महेश भट्टच्या प्रॉडक्शन हाऊस स्पेशल फिल्म्सच्या 30 व्या एनिवर्सरी पार्टीमध्ये दिसली होती.