भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली क्रिकेट मद्ये पायर्या चढत होता तेव्हा त्याचे नाव अनेक मुलींशी जोडलेले होते. हे सर्व 2015 पूर्वीचे आहे. यानंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा जवळ आले होते. व नंतर या दोघांचे लग्न झाले. आता ते पालकही बनले आहेत. पण २०१२ ते २०१४ दरम्यान त्याचे नाव ब्राझीलच्या मॉडेल आणि अभिनेत्रीशी संबंधित होते.
हे संबंध जवळजवळ दोन वर्षे चालले होते. ही मॉडेल आणि अभिनेत्री चे नाव इझाबेला असे होते. ती आणि कोहली 2012 ते 2014 या काळात एकत्र होते. या दोघांचेही संबंध 2013 साली उघड झाले होते. यावेळी ते अनेक वेळा एकत्र पाहिलेे गेले होते. 2014 मध्ये विराट कोहली आणि इजाबेला लेेती वेगळे झाले होते.
याबद्दल कोहलीने कधीही विधान दिले नव्हते. पण इजाबॅली एका मुलाखतीत म्हणाली, होय आम्ही दोन वर्ष रिलेशनशिपमध्ये होतो. परस्पर संमतीने हे संबंध संपले होते. पण आता आम्ही मित्र आहोत. नंतर अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राशीही इसाबेली लेटीचे नाव जोडले गेलेले होते.
मॉडेलिंग आणि अभिनयासाठी इझाबेला ब्राझीलहून भारतात आली होती. ती ब्राझीलच्या रोझारियो शहरातील आहे. २०१२ मध्ये तलाश या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटात आमिर खान, करीना कपूर, राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत होते.
नंतर इझाबेलाने सिक्सटीन, पुरानी जींस सारख्या हिंदी चित्रपटात भूमिका केली. त्याचबरोबर ती नरेंद्र, मिस्टर मजनू आणि वर्ल्ड फेमस लवर यासारख्या तेलगू चित्रपटांमध्येही दिसली आहे. याशिवाय ती गुरु रंधावाच्या लाहोर या गाण्यातही दिसली होती.