मकरंद अनासपुरे प्रमाणेच त्यांची पत्नी देखील आहे मोठी अभिनेत्री,केले आहे एकाच चित्रपटात काम,नाव ऐकून थक्क व्हाल!!

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस झाला त्यांनी वयाची 45 वर्षे पूर्ण केली आहेत. 22 जुलै 1973 रोजी मराठवाड्यातील औरंगाबाद येथे त्यांचा जन्म झाला. ‘मक्या’ या नावाने ते प्रसिद्ध आहेत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ते मराठीतील सुपरस्टार झाले आहेत. मराठवाडा आणि येथील भाषेचा ठसा उमटवणारे मकरंद खर्‍या अर्थाने मराठवाड्याचे हीरो आहेत.

मकरंद अनासपुरे आणि शिल्पा यांचा प्रेमविवाह आहे. शिल्पा मुळच्या मुंबईच्या असून त्यांनी नाटक आणि सिनेमांमधून कामे केली आहेत. २००० साली ‘जाऊ बाई जोरात’ या नाटकात काम करत असताना पहिल्यांदा शिल्पासोबत मकरंद यांची भेट झाली होती.

याचकाळात मकरंद यांना शिल्पा आवडू लागल्या होत्या. येथेच मकरंद यांनी शिल्पा यांना लग्नाची मागणी घातली. शिल्पा यांनी होकार दिल्यानंतर दोघांनी त्यांच्या घरी याविषयी सांगितले. विशेष म्हणजे दोघांचे हे इंटरकास्ट मॅरेज आहे. पण दोन्ही घरुन काहीच विरोध झाला नाही. ३० नोव्हेंबर २००१ रोजी औरंगाबाद येथे दोघांचे पारंपरिक पद्धतीने विवाह झाला.या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

मकरंद अनासपुरेंसोबत झळकल्या आहेत सिनेमात…
शिल्पा आता फारशा चित्रपटसृष्टीत अॅक्टिव नाहीत. पण त्यांनी लग्नानंतर जेवढे सिनेमे केले ते मकरंद यांच्यासोबतच. ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ (2009), ‘सुंबरान’ (2010), ‘तुक्या तुकविला नाग्या नाचविला’ (2010), ‘गड्या आपलं गाव बरं’ (2013), ‘कापुस कोंड्याची गोष्ट’ या सिनेमांमध्ये मकरंद अनासपुरेंसोबत शिल्पा यांनी काम केले.

Leave a Reply

Your email address will not be published.