बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्रींमध्येही माधुरी दीक्षितचे स्थान आहे. माधुरी दीक्षितने तिच्या अभिनयासह चाहत्यांना सौंदर्याने आणि सर्वोत्कृष्ट नृत्याने वेड लावले आहे, तर तीच्या हास्याचे तर लाखो दिवाणे आहेत. माधुरी दीक्षित गेली 37 वर्ष चित्रपटसृष्टीशी संबंधित आहे.
माधुरी दीक्षितने आपल्या चित्रपट कारकीर्दीची सुरूवात 1984 मध्ये केली होती. तिचा पहिला चित्रपट अबोध हा होता, परंतु बॉलिवूडमध्ये एक ठसा उमटवण्यासाठी तिला सुरुवातीच्या काळात खुप संघर्ष करावा लागला.1988 मध्ये, तीच्या यशाचा तारा चमकला आणि ‘तेजाब’ या चित्रपटाद्वारे तिने यशाची चव घेतली.
ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर याच्यासह हिंदी सिनेमात माधुरी दीक्षितची जोडी खूपच पसंत केली जात असे. माधुरी आणि अनिल यांनी सुमारे 20 चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आणि बहुतेक दोघांनाही यश मिळाले. ज्यावेळी माधुरीची फिल्मी करिअरच्या शिखरावर होती, त्यावेळी तिचे नाव ज्येष्ठ अभिनेते संजय दत्तशी संबंधित होते.
या दोघांच्या अफेअरची चर्चा बॉलिवूडमध्ये होती, पण दोघांच नात फार काळ टिकू शकले नाही आणि लवकरच हे दोघेही वेगळे झाले. दोघांनी ‘साजन’ आणि ‘खलनायक’ सारख्या सुपरहिट चित्रपटातही काम केले होते. माधुरी दीक्षितची जोडी ज्येष्ठ आणि दिवंगत अभिनेते विनोद खन्नासमवेत पडद्यावर होती.
1988 मध्ये आलेल्या ‘दयावान’ या चित्रपटात दिवंगत अभिनेते विनोद खन्नासमवेत तिने काम केले होते. या चित्रपटात विनोद आणि माधुरी यांच्यात एक हॉट किसिंग सीन चित्रित करण्यात आला होता, ज्याचा माधुरीला अजूनही खंत वाटतो.
21 वर्षीय माधुरीचे चुंबन घेताना 42 वर्षीय विनोद खन्नाने तीच्या ओठांवर चावा घेतला होता. माधुरीचा हा खूप वाईट अनुभव होता. जेव्हा हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा या किसिंग सीनची बरीच चर्चा झाली होती आणि त्यावर बरीच खळबळ उडाली.
माधुरीने तीच्या दीर्घ चित्रपट कारकीर्दीत तेज़ाब, त्रिदेव, राम-लखन, प्रेम ग्रन्थ, हम आपके हैं कौन, हम तुम्हारे हैं सनम, ये रस्ते हैं प्यार के, दिल तो पागल है, देवदास, अंजाम, कानून अपना अपना, बेटा, दिल, राजा, लज्जा, खलनायक, किशन-कन्हैया, घरवाली-बाहरवाली, कोयला, मृत्युदंड, सैलाब, वर्दी, गुलाब गैंग और डेढ़ इश्किया अशा शानदार चत्रोटात काम केले आहे.