‘या’ क्रिकेटरच्या प्रेमात पूर्णतः वेडी झाली होती माधुरी दीक्षित.. पण वाईट वेळ येताच त्याला सोडून दुसऱ्यासोबत केलं लग्न..

तसं म्हणायला गेलं तर क्रिकेट आणि बॉलिवूडमधील नातं खूप जुनं आहे. बॉलिवूडने क्रिकेट विश्वातील अनेक खेळाडुंचे नाव अभिनेत्र्यां सोबत जोडले गेले आहे. बॉलिवूड अभिनेत्रींशी या क्रिकेटपटूंचे संबंध असल्याचे समजले जायचे. नुकत्याच झालेल्या अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या लग्नामुळे पुष्टी झाली की बहुतेक अभिनेत्रींचे हृदय फक्त खेळाडूंनी जिंकले आहे.

विराट आणि अनुष्काच नव्हे तर त्या आधीही असे अनेक प्रकरण समोर आले आहेत. सागरिका आणि जाहीर यांच्या जोडप्याबद्दल ही आपण ऐकून आहोतच. अलीकडेच प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट म्हणाली की भारतीय फलंदाज रोहित शर्मा तिचा क्रश आहे.

जेव्हा जेव्हा तिला संधी मिळेल तेव्हा त्याची फलंदाजी नक्कीच पाहते. यापूर्वी प्रियांका चोप्राने खुलासा केला की तिला गौतम गंभीर खूप आवडतात आणि ती त्याची फलंदाजी कधीही चुकवत नाही. आणि तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की क्रिकेट आणि बॉलिवूड मधील हे नातं आताचं नाही तर पूर्वापार चालत आलेलं आहे.

आज आम्ही तुम्हाला अशा एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिचा जीव एका क्रिकेटपटू वर जडला होता परंतु काही कारणास्तव त्या दोघांचं लग्न होऊ शकलं नाही. आम्ही बोलत आहोत धक धक गर्ल माधुरी दीक्षित आणि भारतीय पूर्व क्रिकेटपटू अजय जडेजाबद्दल.

धकधक गर्ल माधुरी दीक्षित आजही अनेक हृदयांची धडकन आहे. एक काळ असा होता जेव्हा फक्त प्रेक्षकच नव्हे तर बॉलीवूड अभिनेते देखील माधुरीच्या प्रेमात होते. आपले सौंदर्य आणि अदाकारीच्या जोरावर माधुरी दीक्षितने बॉलिवूडवर अनेक वर्षं राज्य केले. प्रेक्षकांच्या या लाडक्या धकधक गर्लने एकाहून एक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले.

दिल, दिल तो पागल है, हम आपके है कौन, बेटा, पुकार यांसारख्या अनेक चित्रपटात माधुरीने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आणि तिच्या या भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर देखील घेतल्या. दिवसेंदिवस ती अजून बहारदार होत गेली आणि तिची गणना बॉलिवूड च्या टॉप अभिनेत्र्यांमध्ये होऊ लागली. आजही तिच्या रूपाची जादू तितकीच कायम आहे.

तिचे लग्न डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत झाले असून तिला दोन मुलं आहेत. तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटला आपल्याला अनेकवेळा तिचे तिच्या कुटुंबियांसोबतचे फोटो पाहायला मिळतात. माधुरी प्रसिद्धीझोतात असताना एका क्रिकेटरसोबतच्या तिच्या अफेअरची चांगलीच चर्चा रंगली होती. त्या क्रिकेटरसोबत ती लग्न करणार असल्याचे देखील म्हटले जात होते.

हा क्रिकेटर अजय जडेजा असून अजय आणि माधुरीची ओळख एका मासिकाच्या फोटोशूटच्यावेळी झाली होती. त्या भेटीनंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले असे म्हटले जाते. त्या काळात माधुरी प्रचंड प्रसिद्ध होती. पण त्याचसोबत अजय देखील त्याच्या भारतीय क्रिकेटमधील कारकिर्दीमुळे प्रचंड फेमस होता.

अजय आणि माधुरीच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले असताना अजयला बॉलिवूडमध्ये संधी देण्यासाठी ती प्रयत्न देखील करत असल्याच्या बामत्या माध्यमांमध्ये आल्या होत्या. काही वर्षांनंतर त्याने बॉलिवूडच्या काही चित्रपटांमध्ये काम केले होते. पण तोपर्यंत अजय आणि माधुरीच्या अफेअरच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला होता.

अजय जडेजाचे नाव मॅच फिक्सिंग मध्ये आल्यानंतर अजय आणि माधुरी यांच्या नात्यात दुरावा आला असे म्हटले जाते. या दोघांच्या अफेअरची मीडियात चांगलीच चर्चा झाली असली तरी या दोघांनी यावर मीडियात न बोलणेच पसंत केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.