बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक अनेक अभिनेत्री आहेत ज्यांचा अभिनय आपल्या देशातच नाही तर परदेशात देखील प्रसिद्ध आहे. प्रत्येक अभिनेत्रीने आपल्या खास अभिनयाने एक खास स्थान मिळवून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत आणि आपली एक वेगळी ओळखही प्रस्थापित केली आहे. मंग ती प्रियंका चोप्रा , कंगना रनौत असो किंवा आलिया भट्ट.
प्रत्येक अभिनेत्रीने नेहमीच तिच्या अभिनयाचे प्रदर्शन मोठ्या पडद्यावर केले आहे आणि प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी छाप सोडली आहे की ज्यामुळे प्रेक्षकही त्यांना त्याच व्यक्तिरेखेतून ओळखतात, पण अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी नावे बदलली आणि चांगली प्रसिद्धी आणि ओळख मिळविली. आज आम्ही तुम्हाला त्या बॉलिवूड अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत ज्यांनी नाव बदलून प्रसिद्धी मिळविली.
तब्बू– 4 नोव्हेंबरला मुस्लिम कुटुंबात जन्मलेली तब्बू ही बॉलिवूड इंडस्ट्रीचा एक प्रसिद्ध चेहरा बनली आहे. तीचे खरे नाव तबस्म फातिमा हाश्मी आहे. तब्बूने 1985 मध्ये ‘हम नौजवान’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. यानंतर तिने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. तिने स्वतःचे एक स्थान मिळवण्यासाठी तबस्मपासून तब्बू नाव ठेवले.
रीना रॉय– बॉलिवूडमध्ये सर्वांना आपल्या सौंदर्याने घायाळ करणारी ही अभिनेत्री सर्वांनाच प्रख्यात आहे. अभिनेता जितेंद्रची चित्रपटातील नायिका अभिनेत्री रीना रॉय ही मुस्लिम कुटुंबियांशीही संबंधित आहे.
रीना रॉय यांचे खरे नाव सायरा अली आहे. 1972 मध्ये ‘जरूरत’ या चित्रपटातून तीने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. बॉलिवूडमध्ये पाऊल टाकताना सायरा अलीने तिचे नाव बदलून रीना रॉय असे ठेवले.
आलिया भट्ट- अगदी लहान वयातच चित्रपटात पदार्पण करणाऱ्या आलिया भट्टबद्दलची ही गोष्ट फारच कमी लोकांना माहिती आहे की आलिया भट्ट नावाने जरी हिंदू वाटत असली तरी ती मूळच्या मुस्लिम कुटुंबातील आहे. आलिया भट्टच्या आजोबांचे नाव शिरीन मोहम्मद अली होते.
मधुबाला– पन्नास-साठच्या दशकातील एक उत्कृष्ट अभिनेत्री होती, बॉलिवूड अभिनेत्री मधुबालाचे खरे नाव मुमताज बेगम. बॉलिवूडमध्ये येताच तीने स्वतःचे नाव बदलून मधुबाला केले. मधुबालाची खरी ओळख 1947 च्या ‘नीलकमल’ या चित्रपटातून मिळाली. मधुबाला उर्फ मुमताज बेगम दिल्लीतील मुस्लिम कुटुंबातील होती.
मान्यता दत्त- संजय दत्तची पत्नी मान्यता दत्तही मुस्लिम आहे. तिचे खरे नाव दिलनाव शेख असून संजय दत्तची ती तिसरे पत्नी आहे. असं म्हणतात की, चित्रपटात दिसण्यासाठी मान्यताने तिचे नाव दिलनाव ना शेख बदलून मान्यता असे ठेवले. ‘गंगाजल’ चित्रपटातील आयटम नंबर करुन ती चर्चेत आली होती.