तारक मेहता मालिकेच्या चाहत्यांना मोठा धक्का टप्पूच्या वडिलांचे कोरोनाने निधन!!

तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत ‘टप्पू’ची भूमिका साकारलेला अभिनेता भव्य गांधी याच्या वडिलांचं कोरोनाने निधन झालं. गेल्या दहा दिवसांपासून ते रुग्णालयात कोरोनाशी झुंज होते. अखेरच्या दिवसांत त्यांची तब्येत ढासळल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. भव्यचे वडील विनोद गांधी हे बांधकाम व्यावसायिक होते. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

विनोद गांधी यांच्या पश्चात त्यांची पत्नी यशोदा आणि दोन मुले निश्चित आणि भव्य असा परिवार आहे. भव्यला दोन दिवसांपूर्वी चुलत भाऊ समय शाहच्या बहिणीच्या लग्नाला हजेरी लावायची होती. पण वडिलांची प्रकृती खालावल्यामुळे त्याने या लग्नसोहळ्याला व्हर्चुअल पद्धतीने हजेरी लावली.

भव्य गांधीला ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेनं बरीच लोकप्रियता मिळवून दिली होती. २०१७ मध्ये त्यानं ही मालिका सोडली. पण या मालिकेत त्यानं साकारलेली तिपेंद्र उर्फ टप्पू ही भूमिका बरीच गाजली होती. तो घराघरात ओळखला जाऊ लागला. जवळपास ९ वर्ष भव्यनं या मालिकेसाठी काम केलं.

मालिका सोडल्यानंतर तो मालिकेतील कलाकरांच्या संपर्कात असल्याचं त्याच्या सोशल मीडिया पोस्टवरून दिसून येतं. ऑनस्क्रीन आई-बाबा दिशा वकानी आणि दिलीप जोशी यांच्याशी त्यांचं चांगलं बॉन्डिंग आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.