रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक आणि आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी हे देश आणि जगातील एक श्रीमंत नाव आहे. अंबानी कुटुंब मुंबईतील त्यांच्या 27 मजल्यांच्या ‘अँटिलिया’ अलिशान घरात राहतात, जे सुमारे 400,000 चौरस फूट जागेत बांधले गेले आहे.
2010 मध्ये बांधलेल्या या घराची देखरेखी 600 कर्मचारी करतात. अंबानी कुटुंबातील नोकरही शा-ही आयुष्य जगतात. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी आपल्या नोकरदारांना आणि कर्मचार्यांना किती पगार देतात ते आज आम्ही तुम्हाला सांगू ईच्छितो,….
बातमीनुसार मुकेश अंबानी यांच्या घरात काम करणार्या लोकांना प्रथम अंबानी कुटुंबात काम करण्यास सक्षम आहेत की नाही हे अनेक मार्गांनी सिद्ध करावे लागते. अनेक निकषांची पूर्तता केल्यानंतर अंबानी कुटुंबात नोकरी दिली जाते.
एका अहवालानुसार,भारताचा सर्वात श्रीमंत माणूस मुकेश अंबानी आपल्या नोकरांना 10 हजार ते 2 लाख रुपयांन पर्यंत पगार देतात. केवळ पगारच नाही तर मुकेश अंबानी आपल्या कर्मचार्यांना शिक्षण भत्ता आणि विमा यासारख्या सुविधादेखील पुरवतात.
मुकेश अंबानी यांच्या घरी काम करणार्या नोकरदारांची मुलेसुद्धा बाहेर देशात राहत असताना, परदेशात शिक्षण घेत आहेत. अंबानी कुटुंब, कर्मचार्यांना राहणे व खाणे यासारख्या सुविधा पुरवतात,अंबानी कुटुंबातील चालकांना लाखो मधे पगार दिला जातो आणि पगाराबरोबरच त्यांना इतरही अनेक श्रीमंत सुविधा दिल्या जातात.
अलीकडेच अंबानी कुटुंबियांच्या घरात एक छोटा सदस्य आला आहे. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी आजोबा झाले आहेत. अंबानी कुटुंबातील सून श्लोका अंबानी यांनी मुलाला जन्म दिला आहे.