बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आपल्या चित्रपट कारकीर्दीपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. जेव्हा सैफचा परंपरा चित्रपट देखील रिलीज झाला नव्हता तेव्हा तो त्याच्या सिनिअर अभिनेत्री अमृता सिंगच्या प्रेमात पडला होता.
दोघांची एका फोटोशूट दरम्यान भेट झाली होती आणि नंतर त्यांची जवळीक वाढली आणि 20 वर्षीय सैफने 32 वर्षीय अमृताला त्याचा जोडीदार बनवले. तथापि, हे लग्न फार काळ टिकले नाही. 1991 मध्ये दोघांनी लग्न केले आणि 2004 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले.
विवाह मोडण्याचे मुख्य कारण म्हणजे दोघांमधील वयाचे अंतर हे मानले जाते. अमृता सैफपेक्षा खूपच मोठी होती त्यामुळे दोघांमध्ये समेट होऊ शकला नाही आणि घ’टस्फो’ट झाला. यानंतर सैफने 12 वर्षांनी लहान असलेल्या करीना कपूरशी स्वत: चे लग्न केले.
एका मुलाखतीत सैफने स्वत: च करिनाशी लग्न करण्याचा खुलासा केला आणि आपल्या पहिल्या विवाहाबद्दल त्याने काय मिस केले हे सांगितलं. सैफने पुरुषांना सांगितलं की वयाने लहान आसलेल्या स्त्रियांशी लग्न करावे.
‘मी सर्व पुरुषांना तरूण असलेल्या स्त्रीशी लग्न करण्याचा सल्ला देऊ इच्छितो. मजेदार, सुंदर आणि निर्णायक अशा व्यक्तीशी लग्न करणे चांगले आहे. या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. साहजिकच करीनामद्ये ही तिन्ही वैशिष्ट्ये आहेत, ज्यामुळे सैफने तिच्याशी लग्न केले आहे.सैफ-करीनाने 2012 मध्ये लग्न केले होते. ‘टशन’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघे जवळ आले आणि त्यानंतर बरेच दिवस एकमेकांना डेट करून लग्न केले. आता हे दोन मुलाचे पालक बनले आहेत.