प्रसिद्धी मिळताच आपल्या पहिल्या प्रियकरला सोडून गेल्या या अभिनेत्री,पहा जुने फोटोस….

बॉलिवूड मद्ये कधी ना कधी काही स्टारच्या अफेअर आणि ब्रेकअपच्या बातम्या येत राहतात. बॉलिवूडची संस्कृती ज्या प्रकारे बदलत आहे, त्यामधे ब्रेकअप, अफेअर, लग्न, घटस्फोट या गोष्टी काही मोठ्या गोष्टी राहिल्या नाहीत. जेव्हा सेलिब्रिटींची चर्चा असते तेव्हा त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या लहान गोष्टी ते मोठ्या गोष्टीपर्यंत सर्व काही जाणून घ्यायचे असते.

या सर्व प्रकारांमध्ये, लोकांना जाणून घेण्यास सर्वात जास्त रस असलेल्या गोष्टी म्हणजे या सेलिब्रिटींच्या अफेअरची बातमी. आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडमधील नामांकित अभिनेत्रींच्या हिट सिनेमाविषयी व त्यांंच्या फेयर्स बद्दल सांगणारंं आहोत.

दीपिका पादुकोण– दीपिका पादुकोण ही बॉलिवूडमधील नामांकित अभिनेत्रींपैकी एक आहे. दीपिकाने शाहरुख खान सोबत ओम शांती ओम या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. दीपिकाचे नाव अनेक अभिनेत्यांशी निगडित आहे पण दीपिका रणवीर सिंगसोबत लग्न करून आपले विवाहित जीवन सुखी जगत आहे. बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध होण्यापूर्वी दीपिका निहार पंड्याला डेट करत होती. बातमीनुसार या दोघांची भेट अ‍ॅक्टिंग स्कूलमध्ये झाली होती.

अनुष्का शर्मा- अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचे लग्न अगदी छुप्या पद्धतीने झाले आहे. अनुष्का अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी मॉडेलिंग करायची आणि त्यावेळी तिने जोहेब यूसुफ ला. डेट केले आहे. अनुष्का प्रमाणेच जोहेबही रॅम्प मॉडेल आहे. मात्र, अनुष्काने कधीही जोहबशी असलेल्या तिच्या नात्याची कबुली दिली नाही.

आलिया भट्ट- बॉलिवूडमधील एक टॉप एक्ट्रेसेस आलिया भट्ट सध्या रणबीर कपूरसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. जेव्हा आलिया भट्ट अभिनयात येण्यापूर्वी शाळेत शिकत होती, तेव्हा तिचे नाव अली दादरकर याच्याशी संबंधित होते. पण आलियाने चित्रपटात आल्यानंतर अलीपासून स्वत: ला दूर केले होते.

सोनाक्षी सिन्हा- सोनाक्षी सिन्हा चे नाव एडलेब्स च्या एमडी आदित्य श्रॉफशी संबंधित होते. बातमीनुसार या दोघांनी जवळपास 2 वर्षे एकमेकांना डेट केले. पण त्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले. आदित्यने सोनाक्षीच्या ब्रेकअपनंतर टीव्ही अभिनेत्री मेघा गुप्ताशी लग्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published.