या बॉलिवूड कलाकारांचे कार्बन कॉपी डुप्लिकेट पाहून चकित व्हाल…

असे म्हणतात की संपूर्ण जगात एकाच चेहऱ्याचे 7 लोक असतात. परंतु आजपर्यंत आम्हला आमच्या सारखी एकही प्रत पहायला भेटली नाही. पण, बॉलिवूड सेलेब्सचे साम्य बऱ्याच वेळा पाहायला मिळते. काही हमशक्ल स्टार्सनी फिल्म इंडस्ट्रीमध्येही काम केले असून बर्‍यापैकी नाव कमावले आहे. तर आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडमधील काही प्रसिद्ध स्टार्सचे हमशक्ल दाखवणार आहोत.

अमिताभ बच्चन: अशाप्रकारे महान अमिताभ बच्चन ची बरीच हमशक्ल आहेत. पण त्यातील एक म्हणजे आंध्र प्रदेशातील गोपि हा आहे. लोक त्याला आंध्र अमिताभ या नावानेही ओळखतात. गोपीला अमिताभ बच्चन चेे वैशिष्ट्ये मिळतात. तसेच त्याला चित्रपटांबद्दलही प्रचंड आवड आहे.

गोपी ने आपल्या चित्रपट निर्मितीसाठी चित्रपटातील भूमिकांच्या ऑफरदेखील नाकारल्या आहेत. गोपीचा लूक अमिताभ बच्चन याच्यासारखाच दिसतो, कारण बर्‍याच वेळा लोक त्याला बिग बी म्हणून समजलेे होते आणि ऑटोग्राफ देेेेखील मागितल्या होत्या.

अक्षय कुमार: बॉलिवूडमध्ये ‘खिलाडी कुमार’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या अक्षय कुमारचे ही हमशक्ल आहे. काश्मीरमधील रहिवासी असलेला माजिद मीर चे त्याच्याशी बरेच साम्य आहेत. इतकेच नाही तर जेव्हा माजिदची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली होती तेव्हा लोक त्याला अक्षय. समजत होते. त्यानंतर माजिद सोशल मीडिया स्टार बनला होता.

जॉन अब्राहम: अभिनेता जॉन अब्राहमलाही त्याचे साम्य असलेला एक माणूस सापडला आहे. जॉनच्या हमशक्लचे नाव मुबाशीर मलिक आहे. मुबाशीर फाइनेंशियल क्राइम एक्सपर्ट आणि ऑथर आहे. जॉन आणि मुबाशीर चे एक चित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ज्याला खूप पसंती मिळाली होती.

सैफ अली खान: अभिनेता सैफ अली खानच्या नावाचादेखील सेलेब्सच्या हमशक्ल या यादीत समावेश आहे. सोशल मीडियावर सैफ अली खानच्या हमशक्लचे चित्रही खूप व्हायरल झाले होते. सैफ अली खानच्या हमशक्लने परिधान केलेल्या कपड्यांवर इंडियन ऑईलचे स्टिकर होते. ज्यावरून असा अंदाज लावला जात होता की हा माणूस पेट्रोल पंप कामगार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.