दीया मिर्झाने फेब्रुवारीमध्ये बिजनेसमैन वैभव रेखीशी लग्न केले आहे. आता तिनं आपल्या प्रेग्नन्सीची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे. दीया मिर्झाने गुरुवारी मालदीवमधील एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती आपल्या बेबी बंपवर हात ठेवताना दिसत आहे.
यावेळी तिने रेेेड फ्लॉवरचा आउटफिट कॅरी केला आहे. दीया मिर्झाने हा फोटो सामायिक करण्यासह एक सुंंदर कॅपशन्स ही शेयर केेले आहे. तिचा हा फोटो खूप व्हायरल होत आहे.
दीया मिर्झाने फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे की: “माझे भाग्य चांगले आहे … पृथ्वीआईबरोबर एक होणे… जीवनाच्या शक्तींसह एक होणे, जे सर्व काही सुरूवात आहे … कथा, लोरी आणि गाण्यांसह एकरूप होणे .. माझ्या गर्भात मी जाणवलेल्या सर्व स्वप्नांची पूर्तता झाली आहे. ” दीया मिर्झाने चाहत्यांना ही चांगली बातमी अशा प्रकारे सांगितली. तसेच चाहत्यांसह सेलेब्रीज ही या पोस्टवर तीचे अभिनंदन करत आहेत.
दीया मिर्झाने कॅप्शनद्वारे माहिती दिली आहे की, हा गोंडस फोटो तिचा नवरा वैभव रेखा ने क्लिक केला आहे. फोटोवर दीड लाखाहून अधिक लाईक्स आल्या आहेत. दीया मिर्झा पती वैभव रेखाबरोबर मालदीवच्या सुटीसाठी आली आहे. यावेळी अभिनेत्री सोशल मीडियावर आपल्या पोस्टच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवली आहे.