बुमराह झाला पुण्याचा जावई, कोण आहे बुमराह ची बायको??

सोमवार 15 मार्च हा दिवस भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसाठी सर्वात खास ठरलाआहे. आपल्या सर्वोत्कृष्ट गोलंदाजीने क्रिकेट कारकिर्दीत यापूर्वीही बरीच मोठी कामगिरी करनारा बुमराह आता वैयक्तिक आयुष्यातही नवीन उंची गाठली आहे. सोमवारी बुमराहच्या जीवनात एक नवीन पृष्ठ जोडले जाणार आहे. अनेक दिवसांच्या अफवांनंतर बुमराह अखेर सोमवारी लग्न करणार आहे. बुमराह गोव्यातील एका खासगी सोहळ्यात स्टार स्पोर्ट्स ची अँकर संजना गणेशन बरोबर लग्नाचे विधी पूर्ण झालीआहे.

इंग्लंडविरुद्धच्या तिसर्‍या कसोटी सामन्यानंतर जसप्रीत बुमराहने भारतीय संघाकडून सुट्टी घेतली आहे. चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी बुमराहने वैयक्तिक कारणास्तव रजा मागितली होती, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दिली होती. यामुळे बुमराह अहमदाबादमधील चौथ्या सामन्यात खेळू शकला नाही. काही दिवसांनंतर अशी बातमी आली की बुमराह लग्नाच्या तयारीत व्यस्त आहे. परंतू तेेेव्हा हे स्पष्ट झाले नव्हते की वेगवान गोलंदाज कोणबरोबर लग्न करणार आहे.

आता बर्‍याच दिवसांच्या अफवानंतर हे स्पष्ट झाले आहे की टीम इंडिया चा सुपरस्टार स्पोर्ट्स प्रेजेंटर संजना गणेशनशी लग्न करणार आहे. टाईम्स नाओच्या वृत्तानुसार गोव्यात रविवारीच लग्नापूर्वीचे विधी पूर्ण झाले आहेत आणि सोमवारी हे जोडपे लग्नाच्या विधी पूर्ण करणार आहेत.

अहवालानुसार, संपूर्ण विवाह अतिशय खाजगी ठेवण्यात आला आहे आणि माध्यमांना लाईम-लाईटपासून दूर ठेवले आहे. या सोहळ्यामध्ये दोन्ही कुटुंबांचे जवळचे नातेवाईक आणि मित्रच सहभागी असणार आहेत. या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की लग्नात येणाऱ्या पाहुण्यांना त्यांचे मोबाइल फोन न आणण्यास सांगण्यात आले आहे, जेणेकरून हा संपूर्ण कार्यक्रम पूर्णपणे खाजगी राहून मीडिया आणि सोशल मीडियाच्या आवाक्यापासून दूर राहील.

Leave a Reply

Your email address will not be published.