ही प्रसिद्ध अभिनेत्री तब्बल 40व्या वर्षी झाली गर्भवती,लग्नाच्या 5 वर्षानंतर घरी येणार पाहुणा!!

टीव्ही अभिनेत्री किश्वर मर्चंट आणि तिचा नवरा सुय्यश राय यांनी नुकताच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना माहिती दिली की यावर्षी ऑगस्टमध्ये हे दोघे प्रथमच पेरेंट्स होणार आहेत. ही माहिती दोघांनी सांगताच सेलेब्रिटींनी आणि चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन करण्यास सुरवात केली. किश्वरच्या गरोदरपणाची माहिती समोर आल्यानंतर पिंकविला या जोडप्याशी बोलली.

किश्वर ने सांगितले की जेव्हा तिला प्रेग्नेंसी झाल्याचे समजले तेव्हा ती आणि सुय्यश दोघेही चकित झाले होते. किश्वर ने सांगितले की- आम्हाला 17 जानेवारी रोजी माझ्या गरोदरपणाबद्दल माहिती मिळाली आणि तोपर्यंत मी दोन महिन्यांपासून गरोदर होते, परंतु त्याविषयी मला समजलेच नाही. जेव्हा मला थकवा जाणवू लागला तेव्हा मला समजले की यामागील कारण गर्भधारणेचे असू शकते. किश्वर वयाच्या 40 व्या वर्षी आई होणार आहे.

सुयेशने इंस्टाग्रामवर एका पोस्टमध्ये किश्वरसोबतचा फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना माहिती दिली आहे. सुयशने लिहिले आहे की- मी तुझ्या मुलाचा बाप होणार आहे, आम्ही ऑगस्टची वाट पाहत आहोत. सुयशने जो फोटो शेअर केला आहे तो बीचवर क्लिक केेलेला आहे, यात किश्वरही त्याच्यासोबत आहे.

किश्वर आपल्या बेबी बम्पसह दिसली आहे, तर सुय्याश गुडघ्यावर बसलेला आहे आणि आपल्या बेबी बम्प वर हात ठेवला आहे. वाळूवर ऑगस्ट 2021 असे लिहिलेले आहे. किश्वरने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आणि लिहिले आहे की, तुम्ही कधी पालक बनणार आहात? आम्ही ऑगस्ट 2021 ची वाट पाहत आहोत.

तिने मुलाखतीदरम्यान सांगितले की- मी सुयशला प्रेग्नन्सी टेस्टिंग किट घ्यायला सांगितले आणि मग मला कळले की मी गर्भवती आहे. सुरुवातीला ते एका मोठ्या धक्क्यासारखे वाटले परंतु नंतर ते एक आनंददायी सरप्राइज बनले.

सुयश वडील होण्याविषयी म्हणाला- सुरुवातीला जेव्हा आम्हाला आमच्या मुलाबद्दल कळले तेव्हा ते धक्कादायक होते परंतु आता आम्ही विश्वास ठेवतो की ही देवानं दिलेली भेट आहे. हा देवाचा आशीर्वाद आहे. आपल्या आयुष्यातील या नवीन चैप्टर चे आम्ही तीव्रपणे आनंद घेऊ.

वयाच्या 40 व्या वर्षी गर्भवती झाल्यावर किश्वर म्हणाली- स्वत: च्या म्हणण्यानुसार फैमिली प्लान करणे पूर्णपणे योग्य आहे. मी वयाच्या 40 व्या वर्षीदेखील नैसर्गिक पदधतीने गर्भधारणा केली आहे. मला स्त्रियांना सांगायचे आहे की तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. माझ्याप्रमाणे तुम्हीही 35 व्या 36 व्या वर्षी लग्न करू शकताा आणि आई बनू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published.