बॉलिवूडमधील हॉलिवूड स्टार असलेली प्रियंका चोप्रा जोनासचे सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे. ‘ ‘अनफिनिश्ड’ या ऑटोबायोग्राफीतून ती सतत सोशल मीडियावर बरीच प्रसिद्धी असते. पुस्तकात प्रियंकाने तिच्या आयुष्यातील अनेक रहस्ये उघडकीस केेले आहेत, पण आता तिने तिच्या चाहत्यांना मोठे आश्चर्य दिले आहे. ती आता न्यूयॉर्कमधील लोकांना आपल्या देशाची चव चाखवणार आहे. तिने न्यूयॉर्कमध्ये एक आलिशान रेस्टॉरंट उघडले आहे.
प्रियंका चोप्रा ने आपल्या चाहत्यांना नवीन रेस्टॉरंट उघडण्याची चांगली बातमी शेअर केली आहे. तिने इन्स्टाग्रामवर काही छायाचित्रे शेअर करुन ही माहिती दिली आहे. या छायाचित्रांमध्ये ती पती निक जोनासबरोबर पूजा करताना दिसली आहे.
पहिल्या फोटोमध्ये प्रियंका चोप्राने तिच्या भारतीय चवीनुसार या रेस्टॉरंटचे नाव दर्शविले आहे. तिने त्याचे नाव सोना ठेवले आहे. हे नवीन काम सुरु झाल्यावर तिने भारतीय खाद्यप्रतींबद्दलचे प्रेम व्यक्त केले आहे. आता प्रियंकाला तिच्या नवीन व्यवसायाबद्दल चाहते तिचे अभिनंदन करत आहेत.
प्रियंका चोप्रानेही ही छायाचित्रे शेअर करताना एक सुंदर संदेश दिला आहे. तिने छायाचित्रांच्या शीर्षकात लिहिले आहे की, ‘तुमच्या सेवेत सोना सादर केल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. न्यूयॉर्कमधील एक नवीन रेस्टॉरंट जिथे मी भारतीय अन्नावर माझे प्रेम दिलेे आहे. सोना हे भारतीय फ्लेवर्सचे प्रतीक आहे. शेफ हरी नायक हे स्वयंपाकघर चालवतील. त्यांनी एक अतिशय चवदार आणि नाविन्यपूर्ण मेनू तयार केला आहे. तसेच, प्रियंकाने सांगितले की, सोना या महिन्यात उघडत आहे.