सलमान खानच्या या हिरोईनने तिच्या मुलिंची नाव करीना आणि करिश्मा असे का ठेवले?

सलमान खानचा चित्रपट ‘सनम बेवफा’ रिलीज होऊन ३० वर्षे झाली आहेत. या चित्रपटात अभिनेत्री चांदनी सलमानसोबत होती. पहिल्याच चित्रपटात ह्या नायिकेला सलमानसोबत काम करण्याची संधी मिळाली. तिने आपल्या निरागसतेने सर्वांची मने जिंकली होती.

चांदनी नृत्य शिकत असतानाच तिला एका जाहिरातीद्वारे समजले की दिग्दर्शक सावन कुमार चित्रपटासाठी नायिका शोधत आहे, यात सलमान खान मुख्य भूमिकेत आहे. चांदनी यांनी ऑडिशनसाठीही फॉर्म भरला आणि निवडही झाली.

जी लोक अभिनेते बनण्याचे स्वप्न पाहतात अशा लोकांची स्वप्ने सत्यात बदलण्यासाठी एकच जागा आहे आणि ती फक्त आणि फक्त मुंबई आहे. दरवर्षी बरेच लोक या स्वप्नासह मुंबईत पोहोचतात आणि काही लोक या चित्रपटसृष्टीवर राज्य करण्याचे स्वप्न पूर्ण करतात. चांदनी देखील अशीच एक नायिका आहे. जिने सलमान खानबरोबर सनम बेवफा चित्रपटात डेब्यू केला होता. चांदनीचा चित्रपट जबरदस्त हिट झाला. जेव्हा हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि असे मानले जात होते की चांदनी बॉलिवूडमध्ये बराच काळ राहील. मात्र यानंतर तिला तिच्या फिल्मी करिअरमधील यशाची उंची पाहता आली नाही. चित्रपटात काम करायला मिळत नाही हे पाहून चांदनी बॉलिवूडमधून निवृत्त झाली.

आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत तीचे नाव चांदनी आहे. ‘सनम बेवफा’ चित्रपटात तिने सलमान खानच्या विरुद्ध मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले होते. जय किशन, जान से प्यारा, १९४२ अ लव्ह स्टोरी, मिस्टर आझाद अशा चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. तिने एकूण १० चित्रपटांत काम केले पण बॉक्स ऑफिसवर त्यांच्यापैकी कोणताही चित्रपट गाजला नाही आणि भरपूर कमाई करू शकला नाही. यामुळेच तिने बॉलिवूडला कायमचा निरोप देऊन परदेशात शिफ्ट झाली. पैसे मिळवण्यासाठी चांदनीने नृत्य शिकवायला सुरुवात केली आणि त्यानंतर हेच तिचे मिळकतीचे साधन बनले.

चांदनीला दोन मुली आहेत, ज्यांचे नाव तिने बॉलिवूड अभिनेत्री करीना आणि करिश्मा यांच्या नावावरुन ठेवले होते, चांदनीने आपल्या मुलींचे नाव बॉलिवूड चित्रपटांच्या प्रभावामुळेच ठेवले. बॉलिवूडवरील चांदनीच्या आकर्षणाचा अंदाज यावरून काढला जाऊ शकतो की तिचे खरे नाव नवोदिता शर्मा असूनही तिने फक्त चाँदनी हे नाव स्वीकारलं.

फ्लोरिडा,ऑरलँडो अमेरिका येथे तिची स्वतःची नृत्य अकादमी आहे आणि ती लोकांना बॉलिवूडमधील गाण्यांवर तसेच भारतीय शास्त्रीय नृत्य शिकवते. आज चांदनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव रोशन करीत आहे. नृत्य शिकवण्याव्यतिरिक्त चांदनी आंतरराष्ट्रीय स्तरावरही अनेक नृत्य कार्यक्रम केले आहेत. लोकांना माहिती नाही की चांदनी वयाच्या पाचव्या वर्षापासून आधुनिक आणि शास्त्रीय नृत्यचे प्रशिक्षण घेत होती, परंतु तिने चित्रपटांची निवड केली. आज बॉलिवूडसाठी जरी चांदनी एक अज्ञात नायिका असली, तरी चांदनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक सुप्रसिद्ध नाव आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.