निक जॉनस घेणार प्रियंकाशी घ’टस्फो’ट?झाला हा मोठा गैरसमज!!

बॉलिवूड आणि हॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा ची निक जोनासबरोबर जोडी खूपच छान दिसते. तथापि, काही लोक या दोघांमधील वयाच्या अंतरांची देखील खिल्ली उडवतात, परंतु, हे ट्रॉल्स पास करून पती-पत्नीचे हे जोडपे एकमेकांना सुंदरपणे समजूून घेतांंना दिसत आहेत. अलीकडेच एका यूजरने प्रियंकाला विचारले की निक जोनासपासून घटस्फोट घेत आहे का? परंतु या प्रश्नातील सर्वात मोठी चूक ही होती की, वापरकर्त्याने चुकीच्या सेलिब्रिटीवर प्रश्न विचारला.

एका यूजरने ब्रिटीश अभिनेत्री जमीला जमीलला प्रियंका चोप्रा समजले. जमीला जमील आणि निकच्या घटस्फोटावर त्यानेे प्रश्न उपस्थित केेला आहे. या यूजरच्या प्रश्नावर ब्रिटीश अभिनेत्री आणि प्रियांका चोप्रा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या पोस्टवर जमीला जमील आणि प्रियांका चोप्राची प्रतिक्रिया खूप मजेदार आहे.

यूजरने विचारले, ‘निक जोनस आणि जमीला जमीलचा घटस्फोट होत आहे?’ यावर जमीला जमीलने यावर प्रतिक्रिया दिली की, “पूर्णपणे वेगळी असलेेली भारतीय महिला प्रियंका चोप्रा जी माझ्यासारखी दिसत नाही, मला विश्वास आहे की ते एकत्र खूप आनंदित आहेत.” त्याचवेळी ब्रिटीश अभिनेत्रीच्या ट्विटवर प्रियंका चोप्राने उत्तर दिले की, ‘लोल!’

वर्कफ्रंटबद्दल बोलतांना, प्रियंका चोप्रा सध्या लंडनमध्ये असून रुसो ब्रदर्सच्या डायरेक्शन खाली ‘सिटाडेल’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये आहे. प्रियंका चोप्राने नुकताच ‘टेक्स्ट फॉर यू’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. त्याचबरोबर जमीला जमील ‘मेरी मी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्या बरोबर जेनिफर लोपेझ, ओवेन विल्सन, सारा सिल्व्हरमन, जॉन ब्रॅडली, मिशेल बट्ट्यू, क्लोए कोलमन आणि मालुमा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.