करीना आणि सैफ च्या छोट्या मुलाचे फोटो झाले वायरल, छोटा मुलगा दिसायला एकदम…

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री करीना कपूर खान आणि छोटे पाहुणे आज रुग्णालयातून त्यांच्या घरी पोहोचले आहेत. सर्वजण उत्सुकतेने करिना घरी येण्याची आनंदाने वाट पाहत होते. करीना आणि लहान नवाब यांची एक झलक पाहण्याासाठी प्रत्येकजण खूप उत्सुक होता.

काही काळापूर्वी सैफ अली खान आणि तैमूर अली खान, व करीना कपूर खान आणि छोटया बाळ बरोबर ब्रीच कँडी हॉस्पिटलमधून घरी जात असतांना छायाचित्रकाराच्या कॅमेरयात शूट झाले होते. तैमूरच्या धाकट्या भावाला पाहण्यासाठी सर्व जण खुप उस्तू्क होते. बरेच व्हिडिओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरलही झालेे आहेत. आता करीनाच्या मुलाची पहिली झलकही सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.

तैमूर अली खानचा धाकटा भाऊ नैनीच्या मांडीवर गाडीत बसलेला आहे आणि त्याची एक झलक पाहण्यास मीडिया उत्सुक आहे. त्याचवेळी त्याचे छायाचित्र कॅमेरयात कैद झाले आहे. तो नैनीच्या मांडीवर दिसला आहे आणि बेबीचा चेहरा देखील झाकलेला आहे. पण करीना कपूर खानचे चित्र अद्याप पहायला मिळालेले नाही. तसेच कारमध्ये पहिल्या सीटवर सैफ अली खान आणि तैमूर अली खान बसलेले दिसले.

सैफ अली खान ने रविवारी एक निवेदन प्रसिद्ध केले. ज्यात त्याने म्हटले आहे की रविवारी सकाळी करीना कपूर खानने एका मुलाला जन्म दिला. आई आणि मुलगा दोघेही स्वस्थ आहेत. प्रेम आणि समर्थनाबद्दल सर्वांचे आभार. करीनाचा वडील रणधीर कपूरने सांगितले होते की करीनाचा छोटा मुलगा तैमूरसारखा दिसत आहे. आता तैमूरचा कायमचा खेळणारा एक साथीदार आणि मित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.