उच्च रक्तदाब हा मुख्यतः जीवनशैली शी संबंधित रोग आहे, जो औषधोपचार, आहार आणि व्यायामाद्वारे बरा करता येत नाही पण तो नियंत्रणात ठेवता येतो. जर आपण आपल्या आहारात खारट व गोड पदार्थ आणि सैचुरेटेड फैटचे जास्त सेवन केले तर आपला रक्तदाब वाढण्याची शक्यता जास्त असते. दररोजच्या आहारातून या गोष्टी काढून तुम्ही हेल्दी ब्लड प्रेशर मेन्टेन करू शकता. अमेरिकन हार्ट असोसिएशन च्या म्हण्याणुसार उच्च रक्तदाब असलेल्या रूग्णांनी भरपूर प्रमाणात फळे, भाज्या, धान्य आणि कमी चरबीयुक्त प्रथिने सेवन करावेत.
हाइपरटेंशन हृदयविकाराचा धोका वाढवतो.
भारतातील शहरी लोकसंख्येपैकी 34 टक्के लोक उच्च रक्तदाब ग्रस्त आहेत, तर अमेरिकेच्या 45 टक्के लोकांमध्ये उच्च बीपी आहे. उच्च रक्तदाब वेळेवर नियंत्रित न केल्यास हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकसारख्या अनेक समस्या होऊ शकतात. म्हणून, उच्च बीपी असलेेेल्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, त्याबद्दल जाणून घ्या.
जास्त मीठ आणि सोडियम असलेल्या गोष्टी खाणे टाळा.
उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढविण्यासाठी सोडियम जबाबदार असल्याचे मानले जाते. आपण दररोज वापरतो त्या मीठात 40 टक्के सोडियम असते. म्हणून, अशा प्रकारचे जेवण ज्यामध्ये मीठ आणि सोडियम जास्त आहेे असे अन्न, चुकूनही हाय बीपीच्या रूग्णांनी घेऊ नये. चिप्स, पिझ्झा, सँडविच, ब्रेड आणि रोल्स, कॅन केलेला सूप, प्रक्रिया केलेले आणि फ्रोजन फूड इ. चुकूनही हाय बीपीच्या रूग्णांनी खाऊ नये.
चीज खाणे टाळा- चीज हे दुधाचे उत्पादन असते ज्यात प्रथिने आणि कॅल्शियम असतात, परंतु त्यातही सोडियमचे प्रमाण जास्त असते. 512 मिलीग्राम सोडियम चीजच्या फक्त 2 कापांमध्ये वापरलेलं असते. याव्यतिरिक्त, यात सैचुरेटेड फैट देखील असते. तर चीज खाण्यामुळे रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल दोन्ही वाढू शकतात.
हाय बीपी असलेल्या रूग्णांनी लोणचे खाऊ नये- दीर्घकाळ टिकवून ठेवलेले कोणतेही अन्न (म्हणजे खराब होण्यापासून रोखण्यासाठी) जास्त प्रमाणात मीठ वापरले जाते. असे केल्याने, हे अन्न बर्याच दिवसांसाठी टिकवून राहते. लोणच्यामध्ये उपस्थित भाज्या जास्त प्रमाणात मसाले आणि द्रव या पदार्था मद्ये , सोडियमचे प्रमाण जास्त असते.
साखरेशी संबंधित गोष्टी देखील टाळा- मीठच नाही तर साखर देखील आपला रक्तदाब वाढवू शकते. संशोधनात असे दिसून आले आहे की साखरेचा जास्त प्रमाणात वापर केल्याने, विशेषत: गोड पेये घेतल्यामुळे लठ्ठपणा वाढतो आणि लठ्ठपणा हा उच्च रक्तदाबसाठी जोखमीचा घटक आहे. अमेरिकन हेल्थ असोसिएशन सूचित करते की महिलांनी दररोज 25 ग्रॅमपेक्षा जास्त साखर आणि पुरुषांनी 36 ग्रॅमपेक्षा जास्त साखर खाऊ नये.
Enews Marathi वरील लेखाची पुष्टी करत नाही, अमलात आणण्या पूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.