बॉलिवूड नावाने ओळखली जाणारी आपली भारतीय हिंदी फिल्म इंडस्ट्री सामान्य माणसाला कायमच हवीहवीशी वाटते. पण या इंडस्ट्री मध्ये अशा अनेक घटना घडत असतात ज्यांची आपल्याला कल्पना देखील नसते. तिचे खर रूप आपल्याला माहीत नसते. पण त्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत असलेल्या लोकांना मात्र त्या इंडस्ट्रीतील सगळ्या गोष्टी माहिती असतात.
बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री मध्ये नाव कमावण्यासाठी कलाकारांना भरपूर मेहनत घ्यावी लागते. परंतु गोष्ट जेव्हा अभिनेत्रीं बद्दल असते तेव्हा त्यांना आपले अभिनय कौशल्य तर दाखवावेत लागते पण त्यासोबतच असे म्हणतात अभिनेत्रींना फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यात फिल्म इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग कावूचसारख्या गोष्टी घडत असतात.
ही इंडस्ट्री इतकी मोठी आणि अवाढव्य आहे की या मध्ये हरॅसमेंट आणि कास्टिंग काउचचे अनेक प्रकार रोज समोर येत असतात. याचे कारण आहे रोज लाखो तरुण तरुण्या या चंदेरी दुनियेची स्वप्न घेऊन या इंडस्ट्री मध्ये येतात पण सगळ्यांनाच संधी मिळतेच असे नाही.
मग अशा वेळेस छोटा मोठा का होईना परंतु आपल्याला काहीतरी काम मिळावं या हव्यासापोटी अनेक अभिनेत्र्या अशा प्रकारचं कोंप्रोमाईज करायला तयार होतात. त्यांची इच्छा असो व नसो पण या ग्लॅमर च्या दुनियेत टिकून राहण्यासाठी अशी पाऊले उचलली जातात पण त्यावर खुप कमी लोक बोलत असतात.
मराठा मोळी अभिनेत्री श्रुती मराठे सोबत देखील असेच काहीसे घडले होते. परंतु त्यावेळी श्रुती गप्प बसली नाही. तिने त्यावर सडेतोड उत्तर दिले. श्रुतीने ह्यूमन ऑफ बॉम्बे नावाच्या अधिकृत इन्स्टा पेजवर ऑडिशनच्या वेळी निर्मात्याद्वारे तिच्याबरोबर घडलेली एक घटना सर्वांसमोर आणली. .
श्रुती ने सांगितले की, काही वर्षांपूर्वी ती एक हिंदी चित्रपटासाठी ऑडिशन देण्यासाठी मुंबई मध्ये होती. तिच्या ऑडिशन ची सुरुवात अगदी साधारण पद्धतीने झाली होती. मात्र नंतर हळूहळू तिला काही वेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले गेले. श्रुतीला जाणवू लागले की विषय मुद्दामून भरकटवला जात आहे. परंतु तिने लगेच काही प्रतिक्रिया दिली नाही
पण तिच्या शांततेला तिची मजबुरी समजून समोर असलेला दिग्दर्शक मात्र हळू हळू त्याची पातळी गाठू लागला. त्यावेळी तिला समझोता आणि वन नाईट स्टॅन्ड या शब्दांचा वापर करून दाबण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र समोरील व्यक्तीच्या उद्देश काय आहे. हे ओळखण्यास श्रुतीला वेळ लागला नाही.
त्यामुळे लगेचच तिने त्या निर्मात्याला सडेतोड उत्तर दिले. ती म्हणाली की, ‘मी तुमच्यासोबत झोपावे अशी तुमची इच्छा असेल तर तुम्ही या चित्रपटाच्या हिरोला कोणा सोबत झोपायला सांगणार आहात ? श्रुतीचे हे प्रत्युत्तर ऐकून त्या निर्मात्याच्या चेहऱ्यावरील रंग उडाले. श्रुती पुढे म्हणाली की, ‘तुमच्याकडे असे प्रोजेक्ट आले असतील तर ते वेळीच सोडून टाका. कारण दर वेळी आपण गप्प बसून आपलेच नुकसान करत असतो.
श्रुती पुढे म्हणाली की, माझ्या मते जर कधी एखाद्या महिलेच्या बाबतीत काही चुकीचे घडत असेल किंवा तसा घडवण्याचा प्रयत्न केला जात असेल तर त्या महिलेने त्या वेळी योग्य ते प्रतिउत्तर दिले पाहिजे. जेणेकरून ती व्यक्ती इतर दुसऱ्या मुलीसोबत अशी हरकत करू नये.
जर त्यावेळी त्या महिलेने तसे केले नाही तर त्या व्यक्तीची हिंमत अजून वाढेल. अशाने तो इतर महिलांना सुद्धा त्याची शि का र होण्यास प्रवृत्त करेल. त्यामुळे माझे म्हणणे आहे की कास्टिंग काऊच किंवा हरॅसमेंट यांसारख्या प्रकरणाच्या शिकार झालेल्या महिलेने मी टूसारख्या आंदोलनाचे वाट पाहत बसू नये. असे तिने सांगितले.
या पोस्टमध्ये श्रुतीने ती कुठल्या चित्रपटाचे ऑडिशन देण्यास गेली होती किंवा त्या निर्मात्याचे नाव सांगितले नाही. वेडिंग एनिवर्सरी आणि बुधिया सिंह, बॉर्न टू रन यांसारख्या बॉलीवूड चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे.