बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत ज्यांची नावे बर्यापैकी लोकप्रिय आहेत, पण त्यांचे नाव रियल नाही. चित्रपटाच्या जगात काही स्टार्सची नावे वेगळी आहेत, तर रिअल मधे वेगळीच आहेत, अनेक हिरो-हिरोईनची नावे या यादीमध्ये समाविष्ट आहेत, तसेच वृद्ध अभिनेत्याचे नावदेखील या यादीमध्ये समाविष्ट केलेले आहे. कारण या लोकांपैकी काही जणांना असा विचार होता की नवीन नाव मिळाल्यास त्यांंच्या करियर ची ग्रोथ होईल आणि ते झाले.
अक्षय कुमार– बॉलिवूडचा खेळाडू कुमार म्हणजे अक्षय कुमारने त्याचे नाव चेंज केले आहे. हे त्याचे खरे नाव नव्हते. चित्रपटांमध्ये दिसण्यापूर्वी अक्षयचे खरे नाव होते ‘राजीव हरिओम भाटिया’. आजही त्याचे नाव पर्सनल लाइफ मधे लोकप्रिय आहे. दिलीप कुमार– बॉलिवूडचा पहिला सुपरस्टॉप मानला जाणारा दिलीप कुमार याचे नावदेखील खरे नाही. त्याचे खरे नाव ‘मो. युसूफ खान ‘आहे.
नगमा– मुंबईत जन्मलेल्या नग्माचे नाव नंदिता अरविंद मोरारजी ठेवले होते, पण बॉलीवूडमध्ये येताच तिने आपले नाव बदलले.रेखा- फिल्मी जगातील सर्वांत उत्तम चेहरा असलेल्या रेखाचे नाव प्रत्येकाच्या जिभेवर सहज येते, परंतु आपणास ठाऊक आहे का तिचे नाव अर्धे आहे. रेखाचे पूर्ण नाव ‘भानुरुखा गणेशन’ आहे. चित्रपटाच्या जगात येताच तिने तिचे नाव बदलून टाकले.
महिमा चौधरी– 1997 मध्ये ‘परदेस’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये दस्तक देणारी महिमा चौधरी हे तिचे खरे नाव नाही. इतकेच नव्हे तर चित्रपटाचा दिग्दर्शक सुभाष घई याच्याकडून हे नाव तिला मिळाले. वास्तविक, महिमाचे नाव रितु चौधरी आहे. तब्बू– बॉलिवूडमध्ये आजही तब्बूचे नाव फेमस आहे, त्याचे कारण ती अजूनही आपल्या कामाबद्दल एक्टिव आहे. तब्बूचे नाव तबस्सुम हशिम खान होते, परंतु तिने चित्रपटांमध्ये येऊन आपले नाव सोपे केले आणि तब्बू ठेवले
शिल्पा– चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी शिल्पाचे नाव अश्विनी शेट्टी होते, परंतु नंतर तिने आपले नाव बदलून शिल्पा केले.इरफान- इरफान खानचा जन्म 1967 साली झाला होता. त्याचे खरे नाव साहबजादे इरफान अली खान आहे. त्याचे नाव फक्त इरफानच लिहिले जावे, असेे तो स्वतः म्हणाला.रजनीकांत-शिवाजीराव गायकवाड
कैटरीना– कॅटरिना कैफचे खरे नाव केट टर्कोटे आहे. कैटरीनाने तिच्या पहिल्याच चित्रपटाच्या वेळीच तिचे नाव बदलले. तिने कैफ ला आपल्या वडिलांच्या आडनावातून घेतले आहे.