तुम्हाला माहिती असेल की जुन्या काळी गुळाचाच चहा वर्षाचे बाराही महिने पिला जात असे. परंतु आता गुळाचा वापर न करता साखर वापरणे हेच होतांना आपल्याला दिसत आहे. काही निवडक पदार्थांमध्ये टाकण्यासाठीच गुळाचा हा आता वापर केला जात आहे.
तस तर गुळामध्ये साखरेपेक्षा मोठ्या प्रमाणात न्यूट्रिएंट्स हे असतात. परंतु, गुळाच्या चहा हिवाळ्यात घेतल्यास अधिक चांगले असते. कारण गुळ हा गरम पदार्थ आहे. सर्दी-पडस्यापासून गुळामुळे आराम मिळतो. गुळाचा चहा प्यायल्याने डायजेस्टिव एन्जाइम्स अॅक्टिवेट झाल्याने बध्दकोष्ठतेची समस्या दूर होते.
यामध्ये आयरन अधिक असते जे एनीमिया टाळण्यात मदत करते. गुळाचा चहा प्यायल्याने शरीरातील टॉ क्सिन्स दूर होतात आणि त्वचेचा रंग उजळतो. गुळाच्या चहामध्ये पोटॅशियम अधिक असल्याने हार्ट प्रॉब्लम टाळण्यात मदत होते. यामधील सोडियम ब्ल ड प्रेशर कंट्रोल करण्यात मदत करते. यामधील अँटी ऑ क्सीडेंट्स म्हातारपणाचा प्रभाव कमी करतात.
गुळ हा उष्ण पदार्थ आहे. जो सर्दी-खोकल्यापासून आराम देण्यात मदत करतो. हा चहा प्यायल्याने बॉडीची इम्यू निटी वाढते आणि आजारांपासून बचाव होतो. यामध्ये अँटी इन्फ्ले मेटरी गुण असल्याने सांधेदुखी कमी होते. गुळातील कार्बो हाय ड्रेटमुळे कम जोरी दूर होते आणि एनर्जी मिळते.
Enews Marathi वरील लेखाची पुष्टी करत नाही, अमलात आणण्या पूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.