डोळ्या खाली येणारे डार्क सर्कल काढण्यासाठी हा आहे रामबाण उपाय!!

डोळ्यांच्या सभोवतालची त्वचा खूप मऊ आणि नरम असते. जर या त्वचेची योग्य प्रकारे काळजी घेतली नाही तर त्या ठिकाणी डार्क सर्कल्स आणि गडद डाग येेतात. शरीराच्या बाकी त्वचेप्रमाणेच, डोळ्यांभोवतीची त्वचा देखील खूप महत्वाची आहे आणि ही त्वचा खूप नाजूक आहे. तर डोळ्यांच्या सभोवतालच्या त्वचेची काळजी घ्या.

पुर्ण झोप घ्या.
कमी झोपेमुळे डोळ्यांखाली डार्क सर्कल्स येतात. ज्यामुळे तुमचा चेहरा खराब होतो. म्हणून आपण नेहमी पूर्ण झोप घेतली पाहिजे आणि दिवसातून कमीतकमी आठ तास झोपावे. संपूर्ण झोप घेतल्यास आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहतो आणि त्याच बरोबर डोळ्यांच्या सभोवतालची त्वचा देखील निरोगी राहते.

उन टाळा.
उन्हात जाण्यापूर्वी सनस्क्रीन वापरा. उन्हातून निघणार्या हानिकारक किरणांमुळे त्वचेवर वाईट परिणाम होतो आणि त्वचा काळी पडते. हे किरण स्वस्थ डोळ्यांसाठी चांगले मानले जात नाहीत. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही उन्हात जाता तेव्हा सनस्क्रीन लावून बाहेर जा आणि चशमा देखील वापरा. असे केल्याने तुमचे डोळे आणि त्वचा सूर्यप्रकाशापासून बचेल. याशिवाय प्रदूषणही टाळता येईल.

डोळे चोळू नका.
बर्‍याच वेळा खाजआल्याने आपण आपल्या डोळ्यांना चोळू लागते. डोळ्यांना चोळण्याने आसपासच्या त्वचेवर परिणाम होतो आणि त्वचा सैल होते. इतकेच नव्हे तर दररोज डोळे चोळणार्या लोकांना, डार्क सर्कल्स त्यांच्या डोळ्यांखाली येतात. म्हणून खाज सुटल्यावर डोळे चोळण्याचा प्रयत्न करु नका आणि खाजण्याऐवजी डोळे पाण्याने स्वच्छ करा.

ही पेस्ट लावा.
डोळ्यांच्या सभोवतालची त्वचा सुंदर ठेवण्यासाठी आठवड्यातून तीन वेळा डोळ्याखाली संत्रीची पेस्ट लावा. संत्रीची पेस्ट तयार करण्यासाठी प्रथम संत्रीची साल उन्हात वाळवा. जेव्हा ते चांगले वाळतील तेव्हा ते दळवून घ्या आणि त्याची पाउडर तयार करा. या पावडरमध्ये थोडेसे गुलाब जेल किंवा ऐलोवेरा जेल मिसळा आणि ही पेस्ट डोळ्याखालील त्वचेवर लावा. ही पेस्ट वापरल्यास, डार्क सर्कल्स नश्ट होतील आणि त्वचा निरोगी राहील.

चंदन पेस्ट
डोळ्यांच्या सभोवतालची डार्क सर्कल्स देखील चंदनच्या मदतीने काढली जाऊ शकतात. डोळ्याखाली डार्क सर्कल्स झाल्यावर चंदन पावडरमध्ये थोडे गुलाब पाणी मिसळा. ही पेस्ट डोळ्याखाली 15 मिनिटांसाठी लावा. जेव्हा ते कोरडे होइल तेव्हा पाण्याच्या सहाय्याने ते स्वच्छ करा. ही पेस्ट लावल्याने डोळ्यांच्या सभोवतालची डार्क सर्कल्स दूर होतील.

Enews Marathi वरील लेखाची पुष्टी करत नाही, अमलात आणण्या पूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published.