तारक मेहता मधील साध्या भोळ्या दिसणाऱ्या दया भाभीने जेव्हा प्रसिद्धी साठी केली होती बी ग्रेड मुव्ही.. आजही होतोय पश्चात्ताप..

भारतीय टेलिव्हिजन इंडस्ट्रीच्या इतिहासात अश्या अनेक मालिका येऊन गेल्या ज्यांनी अगदीच दशकं च्या दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवली. क्यूँकी सास भी कभी बहू थी, कहानी घर घर की, कसौटी जिंदगी की सारख्या सासू सुनेच्या नात्यावर आधारीत मालिकांची जणू रांग च लागली होती.

अशातच मागील दशकात एक अशी ही मालिका आली जी यांपेक्षा काही हटके असून हलकी फुलकी कॉमेडी प्रकारची असूनही तिने आजपर्यंत 13वर्षे होऊनसुद्धा त्या मालिकेची जादू कायम आहे. आम्ही बोलत आहोत सुप्रसिद्ध मालिका ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेबद्दल.

ही मालिका फक्त देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. आणि त्याचे एकमेव कारण म्हणजे या मालिकेत असलेले वेगवेगळ्या प्रकारचे आगळेवेगळे पात्र. मालिकेतील प्रत्येक पात्राची आपली एक खास शैली आहे जी ह्या मालिकेला बाकी मालिकांपासून वेगळी बनवते. या मालिकेची मुख्य कहाणी एका गोकुलधाम नावाच्या सोसायटीच्या अवतीभोवती फिरते ज्यात विविध जाती धर्माचे लोक एकत्र गुण्यागोविंदाने नांदत आहेत.

याच मालिकेतील एक भन्नाट पात्र म्हणजे दया बेन. मालिकेतील मुख्य पात्र जेठालाल गडा याची पत्नी म्हणून दाखवलेल्या दयाभाभी यांची भूमिका दिशा वकानी यांनी निभावली आहे. दयाभाभी यांचं पात्र देशातच नव्हे तर अगदी जगभरात प्रसिद्ध आहे. त्यांचे अनेक चाहते आहेत.

दयाभाभी यांचं पात्र निभावलेल्या दिशा वकानी यांची ही पहिलीच मालिका होती. सध्या त्यांच्या टेलिव्हिजनवरच्या कमबॅकसाठी अनेक चर्चा सुरू आहेत. चला तर मग जाणून घेऊया दयाबेन म्हणजेच दिशा वकानीबद्दल

दिशा यांचा जन्म गुजरातमधील एक जैन परिवारामध्ये झाला होता. त्यांचे वडील एका थेटर ग्रुपचे मालक आहेत. याच कारणामुळे दिशा यांच्यावर लहानपणापासून अभिनयाचे संस्कार रुजले होते. बालकलाकार म्हणून त्यांनी नाटकामध्ये काम तर केलेच शिवाय त्यांनी पदवी देखील अभिनय क्षेत्रातच पूर्ण केली.

कमाल पटेल आणि धम्माल पटेल, लाली लीला असे अनेक नाटके केली आहेत. गुजरातमध्ये त्या खुप प्रसिद्ध झाल्या होत्या. पण या कालावधीमध्ये त्यांचे कुटुंब मुंबईला शिफ्ट झाले. यानंतर दिशा वकानी यांनी बॉलीवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली. पण त्यांना यश मिळत नव्हते. १९९७ साली दिशा वकानी यांनी एक ‘बी’ ग्रेड चित्रपट केला.

हा चित्रपट होता ‘कमसीन – द अनटच’ या चित्रपटामध्ये दिशा यांनी खुप वेगळी भुमिका निभावली आहे. अनेक बोल्ड सीन देखील दिले होते. त्यानंतर दिशा वकानी बॉलीवूडच्या अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये दिसल्या. त्यांनी ‘देवदास’, ‘मंगल पांडे’ या चित्रपटामध्ये देखील त्यांनी काम केले आहे.

पण २००८ मध्ये त्यांचे नशीब बदलले. दिशा यांनी ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेची ऑडीशन दिली. या मालिकेसाठी त्यांची निवड झाली. अशा प्रकारे त्यांनी दया भाभी हे पात्र स्वीकारले.

२०१५ मध्ये दिशा विवाहबंधनात अडकल्या ल. २०१७ मध्ये दिशा यांनी एका मुलीला जन्म दिला. त्यानंतर त्यांनी मालिकेमध्ये परत येण्यासाठी अनेक अटी आणि नियम ठेवले. जे निर्मात्यांनी मान्य नव्हते. त्यामुळे अद्याप त्यांची या मालिकेत पुनरागमन झालेलं नाहीये. पण प्रेक्षक मात्र आतुरतेने त्यांची वाट पाहत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.