बॉलीवूड मधील या प्रसिद्ध कलाकारांनी केले होते अत्यंत गुप्तपणे लग्न, नंतर मंगळसूत्र पाहून आले चाहत्यांच्या लक्षात!

अभिनेता वरुण धवन 24 जानेवारीला आपली गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत अलिबागमध्ये लग्न करणार आहे. या दोघांचे लग्न खूप साधंं आसून आतापर्यंत कोणतेही चित्र समोर आले नाही.पण दोघांच्या लग्नाविषयी आधीच माहिती देण्यात आली होती. तथापि, बॉलीवूडमध्ये अशी पहिली वेळ नाही जेव्हा लग्न अशा गुप्त पद्धतीने होते. यापूर्वीही बरीच विवाह अतिशय शांततेने आणि गुप्तपणे झाली आहेत. चला तर मग अशाच प्रकारच्या विवाहांवर एक नजर टाकूया…

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी…
हिंदी सिनेमाचा ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र ने दोन विवाह केले आहेत. त्याचे पहिले लग्न प्रकाश कौरसोबत दुसरे लग्न ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनीशी झाले होते. धर्मेंद्रने विवाहित हेेम वर प्रेम केेले होते. 1980 साली या दोघांनीही खंडाळ्यामध्ये गुप्त पद्धतीने लग्न केले.

धर्मेंद्र चा प्रकाश कौर ला, अजिता, विजेता, सनी आणि बॉबी हे 4 मुले आहेत. तर हेमा आणि धर्मेंद्रला दोन मुली अहाना आणि ईशा देओल आहेत. धर्मेंद्र आपल्या दोन बायका आणि सर्व मुलांपासून दूर मुंबई जवळ लोणावळा येथील फार्म हाऊसमध्ये राहत आहे. त्याला आरामशीर आयुष्य जगणे आवडते.

सैफ अली खान आणि अमृता सिंग…
1991 मध्ये सैफ अली खान आणि अमृता सिंग यांनी लग्न करून सर्वांना चकित केले. सैफ अली खान आणि अमृता सिंह यांच्या वयाच्या 12 वर्षाच्या फरकामुळे या लग्नावर बरीच चर्चा झाली होती, पण नंतर हे लग्न मोडले. 2004 साली या दोघांचा घटस्फोट झाला.

घटस्फोटानंतर 62 वर्षीय अमृताने अद्याप लग्न केले नाही. तर 50 वर्षांच्या सैफने घटस्फोटाच्या आठ वर्षानंतर अभिनेत्री करीना कपूरशी लग्न केले. सैफ आणि अमृता यांना दोन मुले, मुलगी अभिनेत्री सारा अली खान आणि मुलगा इब्राहिम आहे. तर करीनाला सैफ पासून मुलगा तमूर अली खान आहे.

श्रीदेवी आणि बोनी कपूर…
हिंदी चित्रपटसृष्टीची पहिली महिला सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणार्‍या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि चित्रपट निर्माते बोनी कपूर यांनीही गुपचूप लग्न केले. या दोघांचे हे दुसरे लग्न होते. श्रीदेवीने 1985 मध्ये ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्तीशी प्रथम लग्न केले, तर बोनीने 1983 मध्ये मोना शौरी कपूरसोबत पहिले लग्न केले.

श्रीदेवी 1988 मध्ये मिथुनपासून विभक्त झाली होती. तर 1996 मध्ये बोनीचाही घटस्फोट झाला. यानंतर श्रीदेवी आणि बोनी कपूर यांचे 1996 साली लग्न झाले. हे दोन कलाकार एकत्र 22 वर्षे राहिले. श्रीदेवीने 24 फेब्रुवारी 2018 रोजी दुबईमध्ये जगाला निरोप दिला.

संजय दत्त आणि मान्यता दत्त…
प्रसिद्ध अभिनेता संजय दत्तने एकूण तीन विवाह केले आहेत. सन 1987 मध्ये संजयने प्रथम रिचा शर्माशी लग्न केले. हे लग्न वर्ष 1997 मध्ये तूटले. यानंतर त्यांनी 1998 मध्ये रिया पिल्लईशी लग्न केले. हे लग्न वर्ष 2008 मध्ये तूटले.

यानंतर संजय दत्तने वर्ष 2008 मध्ये तिसरे लग्न केले होते. हे एक गुप्त लग्न होते. संजयने हे लग्न बर्‍याच दिवसांपासून जगापासून लपवून ठेवले होते. या दोघांनाही मुलगी इकरा आणि मुलगा शरणन अशी दोन मुले आहेत.

राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा
हिंदी चित्रपटसृष्टीची प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी यांचेही लग्न अतिशय गुप्त पद्धतीने झाले होते. 2014 मध्ये राणीने इटलीमध्ये निर्माता आदित्य चोप्रा बरोबर अतिशय सोोप्प्या मार्गाने सात फेरे घेतले. यापूर्वी दोघांनीही बर्‍याच दिवसांपासून एकमेकांना डेट केेले होते.

रणवीर शौरी आणि कोंकणा सेन शर्मा…
अभिनेता रणवीर शोरे आणि अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा यांचे 2010 मध्ये लग्न झाले होते. 10 वर्षानंतर, 2020 मध्ये दोन वर्षे विभक्त झाली.

माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने…
ज्येष्ठ अभिनेत्री माधुरी दीक्षित नेही डॉक्टर श्रीराम नेने यांच्याबरोबर गुप्तपणे सात फेऱ्या मारल्या. 1999 साली अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमध्ये दोघांचे लग्न झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.