पांढऱ्या केसांवर रामबाण आहे हा उपाय, नैसर्गिकरित्या कुठल्याही दुष्परिणामाशिवाय मिळतील दाट काळे केस

वयापूर्वी केस पांढरे होण्याच्या समस्येमुळे बरेच लोक त्रस्त आहेत. आणि तरुण वयातच लोकांचे केस काळे ऐवजी पांढरे होतात. वयापूर्वी केस पांढरे होण्याची अनेक कारणे आहेत.बरेच वेळा चुकीचे खाणे, तणाव आणि केसांची योग्य काळजी न घेतल्यामुळे बरेच वेळा केस पांढरे होतात.जर आपले केसही पांढरे होत असतील तर आपण त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि खाली दिलेल्या उपाययोजना त्वरित करून पहा. हे उपाय केल्यास केस पांढरे होण्यापासून रोखले जातील आणि केस काळे राहतील.

बटाट्याचा हेयर मास्क लावा –
बटाट्याची साल केसांसाठी फायदेशीर मानली जाते आणि बटाट्याच्या सालेचा हेयर मास्क लावल्याने पांढरे केस काळे होतात. बटाट्याच्या सालीमध्ये स्टार्च असतो, जो एक नैसर्गिक रंग मानला जातो आणि स्टार्चमुळे केस काळे होतात. बटाटाच्या सालीमध्ये स्टार्चव्यतिरिक्त व्हिटॅमिन ए, बी आणि सी देखील आढळतात, ज्यामुळे केस गळणे देखील थांबते. म्हणून केसांच्या आरोग्यासाठी बटाट्याच्या सलेचा हेयर मास्क लावा.

बटाट्याच्या साली चा हेयर मास्क तयार करण्याची पद्धत..
बटाटा सोलून घ्या आणि त्याची साल एकत्र करून थंड पाण्यात ठेवा. यानंतर, 10 मिनिटे साल कमी गॅसवर उकळवा. ते उकळल्यानंतर, साल पाण्यातून बाहेर घ्या आणि त्याला मिक्सर मधे बारीक करून घ्या. आता बटाटा पेस्ट तयार होईल. या पेस्टमध्ये तेल घालून ते हेअर पॅक केसांवर लावा. कमीतकमी अर्धा तास केसांवर ठेवा आणि जेव्हा ते कोरडे होईल तेव्हा पाण्याच्या मदतीने केस धुवा. आठवड्यातून दोनदा हे हेअर मास्क लावा. आपले केस नैसर्गिकरित्या काळे होतील.

मेथीचा हेयर मास्क.
मेथीची पेस्ट केसांवर लावल्याने केस काळे आणि लांब होतात. ज्या लोकांचे केस पांढरे आहेत त्यांनी त्यांच्या केसांवर मेथीची पेस्ट नक्कीच लावावी. मेथीमध्ये आढळणारे घटक केस काळे ठेवतात आणि केस पांढरे होऊ देत नाहीत.

मेथीचा हेयर मास्क बनवण्याची पद्धत.
मेथीचे हेयर मास्क बनविणे खूप सोपे आहे. मेथीच्या दाण्यांना वाटीमद्ये तुम्ही पाण्यात भिजवून ठेवा. मेथीच्या दाण्यांना आठ तास पाण्यात राहू द्या. त्यानंतर ही दाने पाण्यामधून काढून घ्या आणि बारीक करा. त्यांना बारीक करून पेस्ट बनवा. नंतर या पेस्टमध्ये नारळ तेल घाला. अर्ध्या तासासाठी हे पेस्ट आपल्या केसांवर लावा. ते कोरडे झाल्यानंतर केस शैम्पूच्या सहाय्याने धुवा. आपण ही पेस्ट आठवड्यातून तीन वेळा लावा. आपले पांढरे केस पूर्णपणे काळे होतील आणि केस गळतीपासून मुक्त होईल.

Enews Marathi वरील लेखाची पुष्टी करत नाही, अमलात आणण्या पूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published.