जेव्हा डॉन दाऊद इब्राहिमने ‘या’ अभिनेत्रीला एका रात्रीसाठी उचलून आणले आपल्या अड्डयावर.. तिच्या प्रेमात झाला होता वेडा..

‘बॉलिवूड’ नावाने ओळखली जाणारी आपली भारतीय चित्रपट सृष्टी आणि भारतातील गद्दारांचा अड्डा असलेले ‘अंडर-वर्ल्ड’ या दोन्ही क्षेत्रातील व्यक्तींचा असलेला संबंध आपण वेळोवेळी बघत आलो आहोत. कितीही नाकारले गेले तरी या दोन्ही क्षेत्रातील व्यक्ती एकमेकांशी संपर्कात असल्याचे अनेक वेळा दिसून आलंय. मग ते अभिनेता संजय दत्तचे अंडर-वर्ल्ड सोबत असलेले संबंध असोत किंवा अभिनेत्री मोनिका बेदीचे अबू सलेम सोबतचे प्रेम प्रकरण.

आपण सर्वांनी अंडर-वर्ल्ड डॉन दाऊदबद्दल ऐकले असेलच. एकेकाळी अंडर-वर्ल्ड जगतात दाऊदची किती शक्ती होती हे देखील आपल्याला माहीत आहेच. दाऊद इब्राहिमची अशी एकही पार्टी झाली नव्हती ज्यात चित्रपटातील कलाकारांनी हजेरी लावली नाही. अशा अनेक सिनेतारकांची छायाचित्रेही समोर आली होती, ज्यामुळे बराच गदारोळ झाला होता.

इतकेच नव्हे तर दाऊदबरोबर बर्‍याच तार्‍यांच्या संभाषणांचे रेकॉर्डिंगही लीक झाले आहेत. त्यातून अनेक कलाकारांचे दाऊदसोबत असलेले संबंध लोकांच्या नजरेत आले. असे म्हणतात की दाऊद खूपच रंगेल माणूस होता. त्याच्याकडे पॉवर आणि अफाट पैसा तर होताच सोबतच तो शौकीन माणूस होता.

बॉलिवूडमध्ये असे अनेक तारे आहेत ज्यांची नावे दाऊदशी जोडली गेली होती, त्या यादीत बऱ्याच अभिनेत्रींची नावे समाविष्ट आहेत कारण एकेकाळी जेव्हा दाऊदला एखादी अभिनेत्री आवडायची, तेव्हा तिला मिळवण्यासाठी तो कोणत्याही थराला जायचा.

मग अशावेळीकोणत्याही परिस्थितीत, दुबई असो की सात समुद्र पार, त्याच्या अड्ड्यावर त्या अभिनेत्रीला बोलवायचा आग्रह दाऊद धरायचा. यासाठी आपल्या मुंबई मध्ये असलेल्या चमच्यांवर दबाव आणून आणि वाटेल तितका पैसा फेकून दाऊद आपली इच्छा पूर्ण करून घेत असे. एकदा का दाऊदने ठरवलं तर त्या अभिनेत्रीला आपल्या जाळ्यात अडकवल्याशिवाय दाऊद माघार घेतच नसे.

असेही म्हटले जाते की बॉलिवूडमध्ये असे अनेक तारे आहेत जे स्वताहून दाऊदच्या संपर्कात जाण्यासाठी धडपडत असत. याचे कारण असे होते की दाऊदचा बॉलिवूड वर खूप मोठा दरारा होता. कलाकारांच्या वाईट काळातही त्याच्या प्रभावाच्या आधारे त्यांना निर्मात्यांकडून चित्रपट मिळत असत.

आज आम्ही तुम्हाला दाऊदच्या सर्वात प्रसिद्ध प्रेयसी विषयी सांगणार आहोत, जी एक नामांकित बॉलिवूड अभिनेत्री देखील होती. आम्ही तुम्हाला एका नायिकेबद्दल सांगणार आहोत जिने एकेकाळी बॉलिवूडवर राज्य केले होते. एका रात्रीत स्टार बनलेल्या या अभिनेत्रीला राम तेरी गंगा मैली या चित्रपटाच्या बोल्ड सीनवरून ओळख मिळाली कारण अशा प्रकारचे अंग प्रदर्शन या आधी क्वचितच पाहिले गेले होते. आम्ही बोलत आहोत या चित्रपटाची अभिनेत्री मंदाकिनी नजीरबद्दल.

खरं तर एका ज्येष्ठ पत्रकाराने दाऊदच्या या पैलूंचा पर्दाफाश केला ज्यामध्ये बर्‍याच गोष्टी समोर आल्या. वास्तविक आजही आपण मेरठमधील साकेत आणि गोल बाजाराच्या ठिकाणी जाल, नंतर आपल्याला काही वृद्ध लोक सापडतील जे याच शहरात वाढलेली मंदाकिनी आपल्या मित्रांसह इथल्या रस्त्यावर सायकल चालवत असे हे सांगतील. तिचे कुटुंब अजूनही मेरठमध्येच वास्तव्यालाआहे. मंदाकिनी यांचे कुटुंब ख्रिस्ती धर्मावर विश्वास ठेवत असे त्यामुळे त्यांनी जोसेफ हे आडनाव लावले.

पण एकाएकी मंदाकिनी चे नशीब असे पालटले की या छोट्याश्या कुटुंबातून आलेली ही मुलगीतिचे वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी चित्रपटांत नायिका बनली. असे म्हणतात की मंदाकिनी सुरुवातीपासूनच खूप महत्वाकांक्षी मुलगी होती, ज्यामुळे तिला लवकरात लवकर क्षितिज गाठायचं होत. असंही म्हटलं जात आहे की ती मेरठची पहिली मुलगी होती जिने चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरवात केली.

आपल्या ‘राम तेरी गंगा मैली’ या पहिल्याच चित्रपटांतून मंदाकिनी रातोरात सुप्रसिद्ध झाली. त्यानंतर मंदाकिनीला मागे वळून बघावं लागलं नाही. एकामागोमाग एक सुपरहिट चित्रपट तिच्या वाट्याला आले. अशातच दाऊदची नजर तिच्यावर पडली आणि तो तिच्या प्रेमात वेडा झाला. त्याने तिला आपल्या जाळ्यात ओढून घेतले.

मंदाकिनी ही दाऊदची पत्नी होती की प्रेयसी होती याबद्दल बर्‍याच चर्चा झाल्या. केवळ दाऊद किंवा मंदाकिनीच ही वस्तुस्थिती सांगू शकतील. पण एक गोष्ट खरी आहे की मंदाकिनी दाऊदसोबत दुबईतच राहिली आणि तिने निव्वळ काही पैसे आणि प्रसिद्धीसाठी दाऊदसारख्या भयानक गद्दारांशी संबंध ठेवल्याची खंत आजही तिच्या चाहत्यांमध्ये आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.