मित्रांनो, भारतीय समाजव्यवस्थेत वर्णभेदाला अजिबात थारा नाही आहे. परंतु वर्णभेद जरी नसला तरी मात्र सौंदर्याची संकल्पना ही आजही कुठेतरी गोऱ्या रंगाशी जोडली गेल्याची दिसून येते. जणू गोरं असणं म्हणजे सुंदर असणं असं काही समीकरणच बनलं आहे. त्यामुळेच सर्वच लोकांना आपण अधिकाधिक गोरं कसं दिसता येईल अशी चुरस लागलेली असते.
पण खरं सांगायचं तर रंग आणि सौंदर्य या दोन गोष्टींचा एकमेकांशी काही एक संबंध नाहीये. आपला आत्मविश्वास, आपले शरीर, आपल्या त्वचेची गुणवत्ता आणि आपला आत्मविश्वास या सगळ्या गोष्टी एखाद्या व्यक्तीला आकर्षक बनवत असतात. एखादी व्यक्ती त्वचेने पांढरी नसली तरी आपल्या तंदुरुस्त आणि सुदृढ शरीरयष्टीने देखील लोकांना आकर्षित करू शकते
बरं ही तर गोष्ट झाली आपण सामान्य लोकांची परंतु मनोरंजन क्षेत्र मग ते चित्रपट असो वा टेलिव्हिजन, त्यात सुंदर दिसण्यासाठी मात्र अभिनेत्र्यांमध्ये कायम चढाओढ पाहायला मिळते. जास्तीत जास्त मेक अप वापरून अधिकाधिक गोरं कसं दिसता येईल याकडे सगळ्यांच लक्ष असतं. परंतु या सगळ्या गोंधळात एक अशी अभिनेत्री देखील आहे जी खरंतर रंगाने गोरी आहे परंतु काळी दिसण्यासाठी मेक अप करते. विश्वास नाही बसत ना, चला तर जाणून घेऊयात कोण आहे ती
आम्ही बोलत आहोत ‘रंग माझा वेगळा’ मधील दीपा देवकुळे आणि आता दीपा इनामदार झालेल्या अभिनेत्रीबद्दल. दिपाचे खरे नाव रेश्मा शिंदे आहे. तिचा जन्म २७ मार्च १९८७ ला मुंबईमध्ये झाला आहे आणि तिचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबईमध्येच झाले आहे. रेश्मा ही विवाहित असून तिच्या जोडीदाराचे नाव अभिजित चौगुले आहे.
रेश्मा आणि अभिजित यांचे लग्न २९ एप्रिल २०१२ मध्ये झाले. अभिजित हा मूळचा कोल्हापूरचा आहे परंतु तो सध्या पुण्यामध्ये नोकरी करतो. तो सिव्हिल इंजिनिअर आहे. रेश्माची टीव्हीच्या पडद्यावर सुरुवात ही २०१० मधल्या ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या मराठी शोपासून झाली. त्याच शोमध्ये ‘बंध रेशमाचे’ या मालिकेच्या निर्मात्याने तिला पहिल्यांदाच पाहिले होते.
त्यानंतर तिने ‘बंध रेशमाचे’ ही मालिका केली. रेश्माने नंतर ‘लगोरी मैत्री’ ही मालिका केली आणि ती त्यामुळे एक स्टार झाली. तिच्या या पूर्ण करिअरमध्ये तिने झी मराठीवरील ‘नांदा सौख्यभरे’ यात महत्त्वाचे काम केले आहे. तिने मराठी चित्रपटात सुद्धा काम केले आहे. ‘देवा एक अंतरंगी’ हा तिचा पहिला चित्रपट २०१७ मध्ये आला. ‘रंग हे प्रेमाचे, एक अलबेला, लालबागची राणी’ यासारख्या चित्रपटात सुद्धा तिने काम केले आहे
सध्या ती आपल्याला ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत एक सोज्वळ मुलीची भूमिका साकारताना दिसत आहे, जिला तिच्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व व्यक्तींची काळजी असते आणि ती भूमिका रेश्मा अतिशय चांगल्या पद्धतीने निभावत आहे. अशी ही रेश्माची आजपर्यंतची सिनेसृष्टीतील कारकीर्द आहे आणि पुढेही ती अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहील.