प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांचा जन्म १ नोव्हेंबर १९६५ मध्ये झाला. त्यांनी अनेक मराठी व हिंदी चित्रपटात काम केले आहे. १९८० च्या दशकादरम्यान त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका केल्या होत्या. जमाने को दिखाना है, प्रेम रो ग, सौतन या सारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या होत्या. त्यातल्या त्यात प्रेम रो ग हा त्यांचा चित्रपट खूप गाजला होता. ऋषी कपूर यांच्यासोबत तिच्या केमिस्ट्रीची त्याकाळी खूपच चर्चा झाली होती.
चित्रपट निर्माता निर्माता प्रदीप शर्मा यांच्यासोबत पद्मिनी कोल्हापुरी यांचे लग्न झाले आहे. पद्मिनी कोल्हापुरे जेव्हा चित्रपटसृष्टीत आल्या त्यावेळी बालकलाकारांची खूप मागणी होती. चित्रपटातील नायक किंवा नायिका यांचे बालपणा पासूनची मैत्री दाखवून मग तरुणपणीचा रोमान्स दाखविण्याचा प्र घा त होता.
वयाच्या पाचव्या वर्षी पद्मिनी कोल्हापुरे यांनी ’एक खिलाडी बावन पते’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. गुलजार यांच्या किताब या बालचित्रपटात पद्मिनी आणि बहीण शिवांगी कोल्हापुरे यांनी ‘अ-आ-इ-ई, मास्टरजी की आ गई चिट्ठी…’ हे गाणे म्हटले होते. ‘यादों की बारात’ या चित्रपटाचे ’टायटल सॉंग लता मंगेशकर आणि पद्मिनी कोल्हापुरे यांनी गायले होते.
पद्मिनीचा आवाज खूप छान होता आणि मंगेशकरांशी नाते असल्याने लता-आशा मंगेशकरांबरोबर कोरस गाण्यासाठी पद्मिनीला संधी मिळे. १९८२ साली प्रदर्शित झालेल्या प्रेम रो ग ह्या चित्रपटासाठी पद्मिनी कोल्हापुरेला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला होता. ‘विधाता’ चित्रपटात पद्मिनी कोल्हापुरे यांना दिलीप कुमार, संजीव कुमार और शम्मी कपूर या तीन महान कलावंतांबरोबर काम करायला मिळाले.
प्रिन्स चार्ल्स मुळे मिळाली प्रसिद्धी
आहिस्ता-आहिस्ताचे शूटिंग पहायला आलेल्या प्रिंस चार्ल्सचे पद्मिनी कोल्हापुरेने धावत धावत जाऊन चुंबन घेतले आणि तिला जगभर प्रसिद्धी मिळाली. पद्मिनी कोल्हापुरे यांना एक मुलगा आहे आणि त्याचे नाव प्रियांक शर्मा असे आहे. प्रियांक यांचे नुकतेच लग्न झाल्याची चर्चा आहे. प्रियांकने त्याची गर्लफ्रेंड शहाजान मोरानी यांच्यासोबत आठ डिसेंबर रोजी कोर्ट मॅरेज केल्याचे सांगण्यात येत आहे.
शहाजान ही करीम मोरानी यांची मुलगी आहे.प्रियंक आणि सबकुछ कुशल मंगल या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे तर शहाजान हिने अल्वेज कभी-कभी, हॅपी न्यू इअर या चित्रपटासाठी असिस्टंट डायरेक्टर बनली होती. आता या लग्नामध्ये प्रियांक याची करवली म्हणून श्रद्धा कपूर हिला मिरवण्याचा मान मिळणार आहे.
आणखी बातम्यासाठी आत्ताच लाईक बटण दाबा.
College essay authors assist in providing students with a quality essay affordable-papers.net that helps in their overall operation in the classroom.