दया नंतर आता जेठालालही सोडणार तारक मेहता ही मालिका?दिलीप जोशीनी केला खुलासा!!

तारक मेहता का उल्टा चश्मा मधिल जेठालाल म्हणजे दिलीप जोशी अनेक नवीन ऑफर आल्या आहेत.तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. त्यातली जेठालाल आणि दयाबेनची जोडी सर्वात हिट आहे. जेठालाल साकारणाऱ्या दिलीप जोशींच्या अभिनयामुळे प्रेक्षकांचं मनोरंजन होतं.

गेल्या 13 वर्षापासून अर्थात मालिकेच्या पहिल्या भागापासून दिलीप जोशींनी या मालिकेत काम केलं आहे. दिलीप जोशींनी काही गुजराती सिनेमांमध्येही काम केलं आहे. हम आपकें हैं कौन, व्हॉट्स युअर राशी, मैनें प्यार किया, फिर भी दिल हैं हिंदुस्तानी अशा बॉलिवूडपटातही ते झळकले आहेत. तारक मेहता या मालिकेनंच दिलीप जोशींनी खरी ओळख दिली. आज त्यांना जेठालाल म्हणूनच बरेच लोकं ओळखतात.

दिलीप जोशी यांना बऱ्याच सिनेमांच्या आणि मालिकांच्या ऑफर्स येत आहेत. त्यामुळे ते ही मालिका सोडणार का? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिलीप जोशी यांनी स्वत:चं त्यांना येणाऱ्या ऑफर्सचा खुलासा केला. एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिलीप जोशी यांनी स्वत:चं त्यांना येणाऱ्या ऑफर्सचा खुलासा केला.

तारक मेहताच्या शूटिंगमध्ये ते पूर्ण दिवस व्यस्त असतात. दिलीप जोशी यांना अनेक ऑफर्स येत असल्या तरीही त्यांनी या ऑफर्सना नकार दिला आहे. दिलीप जोशींना तारक मेहता ही मालिका सोडण्याची इच्छा नाही. त्यामुळे कितीही चांगल्या ऑफर्स आल्या तरी त्या ऑफर्सना नकारच देतात.आधीच दिशा वकानी गेल्या अनेक महिन्यांपासून मालिकेत झळकलेली नाही. इतर अनेक कलाकारही ही मालिका सोडून गेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.