नुकतेच मुंबईत टीव्ही आणि शो कलाकारां साठी एक अवॉर्ड शो आयोजित करण्यात आला होता. यावेळी छोट्या पडद्यावरील तारे ही सहभागी झाले होते. काहीजण रेड कार्पेटवर प्रभाव पाडतांना दिसत असले तरी, बहुतेकांच्या शैलीने चहात्यांना निराश केले. नेहमीच एकापेक्षा अधिक स्टाईलमध्ये दिसलेल्या टीव्ही अभिनेत्रीसुद्धा अशा कपड्यांमध्ये दिसल्या आणि त्यांचे कौतुक करणेही अवघड झाले, असे काहीसे त्या दिसत होत्या. चला बघा, या पुरस्कार सोहळ्यात सहभागी झालेल्या अभिनेत्रींपैकी कोण प्रभावित झाले आणि कोण अपयशी ठरले?
पूजा बॅनर्जी- पूजा बॅनर्जीच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर नजर टाकल्यास तुम्हाला तिचे एकापेक्षा जास्त स्टाइलिश छायाचित्रे पाहायला मिळतील, पण यावेळी अभिनेत्रीने निवडलेल्या ड्रेसचे कौतुक करणे कठीण झाले आहे. रेड कार्पेटसाठी पूजाने हॉल्टर नेकलाइन ड्रेस निवडला. या ब्लू कलरच्या पोशाखात तिने पांढर्या हील्सचा वापर केला होता. हा लूक पूजाला अजिबात शोभत नव्हता.
श्रीती झा- श्रीती झाही निळ्या रंगाच्या गाऊनमध्ये दिसली. स्लिम फिगर अभिनेत्रीने बॉडीकॉन मर्मेड गाऊन घातला होता. श्रीतीने डायमंड चॉकर आणि इयररिंगसह या लूकची पूर्तता केली होती. अभिनेत्रीचा हा लुक तिच्यावर बर्या पैकी ठीक दिसत होता.
अंकिता लोखंडे – अंकिता लोखंडे नेहमीच स्टायलिश लुक मधे असण्याची चहात्यांची अपेक्षा असते, परंतु यावेळी तीची शैली पूर्णपणे अपयशी ठरली. अभिनेत्रीने अवॉर्ड शोसाठी ब्लॅक गाऊन निवडला, त्यातील फिटिंग,नेक डिजाइन पासून तर फॉल पर्यंत काही प्रभावित होऊ शकले नाही. त्या वर अभिनेत्रीची लाल लिपस्टिक आणि कानातले आणि बराच मेक-अप तीला सूट होत नव्हता, ज्या कारणास्तव ती खराब दिसत होती.
रुही चतुर्वेदी – अभिनेत्री रुही चतुर्वेदी ने बोल्ड लूक निवडला. अभिनेत्रीने कीफोल डिझाईनचे ऑफ-शोल्डर गाऊन परिधान केले होते, त्यामध्ये प्लीट्स तसेच स्लिट डिझाईन्स देखील होते. लाँग डँगलर्स, वेव्ही हेअर आणि न्यूड टोन मेकअपचा शेवटचा टच तिने दिला होता. व्हाईट कलरचा हा बोल्ड आउटफिट रुहीला अजिबात शोभत नव्हता. नेहा मार्डा – नेहा मार्डा तिच्या क्यूट लुकसाठी ओळखली जात होती, पण ती ह्या वेळी बिलकुल गोंडस दिसत नव्हती. या वेळी तिने गोल्डन येलो कलर ची साड़ी परिधान केली होती. हा संपूर्ण देखावा असा होता की कोणाला ही हा लुक आवडला नाही.
निर्मला चंद्र – अभिनेत्री निर्मला चंद्र रेड कार्पेटवरही तिच्या टीव्ही पात्राची साडी परिधान करतांना दिसली. या अभिनेत्रीने पिंक कलरची सिल्क साडी घातली होती ज्यावर सोन्याचे मुद्रण होते. तिने स्लीव्हलेस ब्लाउजसह हे परिधान केले होते. अभिनेत्रीने कर्ल बन मध्ये आपले केस स्टाईल केले, सोन्याचे हार आणि कानातले घातले होते . हा लूक कोठूनही रेड कार्पेट वर शोभत नव्हता.