बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारसमवेत एका म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली गेलेली अभिनेत्री क्रिती सॅनोनची बहीण नुपूर सॅनोन लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. जॅकी भग्नानी बॉलिवूडमध्ये नुपूर लाँच करत आहे. निर्माते जॅकी भगनानी आणि दीपशिखा देशमुख आपल्या प्रोडक्शन हाऊस पूजा एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली नुपूर ला लाँच करण्याची योजना आखत आहेत. या वर्षाच्या सुरुवातीस जॅकी भगनानीच्या पूजा एंटरटेनमेंटने अलाया एफ ला लॉन्च केले असून आता ते रुपेरी पडद्यावर नुपूर सॅनोन पा लाँच करणार आहे.
नुपूरला अलीकडच्या काळात पूजा एंटरटेनमेंटच्या ऑफिसमध्ये वारंवार पाहिले गेले आहे. प्रॉडक्शन हाऊसच्या जवळच्या एका सूत्राने सांगितले की, “नुपूरने तिच्या म्युझिक व्हिडिओमध्ये चांगली कामगिरी केली. ज्याने केवळ प्रेक्षकच नव्हे तर जॅकी भगनानी देखील प्रभावित झाले होते, सध्या जॅकी तिच्या प्रॉडक्शन हाऊसमधून नवीन आणि तरुण टॅलेंटला संधी देण्याचा विचार करीत आहे. नुपूर चित्रपटाची तयारी करत असून पदार्पणासाठी सज्ज झाली आहे.
त्या प्रकल्पाचे नाव अद्याप निश्चित झाले नाही. मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षी सुरू होऊ शकते. नूपूर सोशल मीडियावरील पोस्टमुळे बर्याचदा चर्चेत राहते. तिने आपली छायाचित्रे सोशल मीडियावरही शेअर केली आहेत. अक्षय कुमारच्या विरूद्ध नुपूर, सुपरहिट सोंग मध्ये दिसली आहे.