छोट्या पडद्यावरील अशा अनेक मालिका आहेत ज्या खूप काळापासून प्रेक्षकांच्या मनात विशेष जागा निर्माण करत आल्या आहेत. त्यामधील एक विनोदी मालिका ‘ तारक मेहता का उल्टा चश्मा ‘ देखील आहे. ही मालिका जवळपास 12 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. तारक मेहता का उल्टा चश्मा मधील सर्व कलाकार आपल्या भूमिकांमुळे घरा-घरात प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये एक भूमिका ही चंपक चाचा म्हणजेच बापूजी यांची आहे.
तारक मेहता का उल्टा चश्मा मध्ये चंपक चाचा ची भूमिका अमित भट्ट हे साकारतात. त्यांची ही भूमिका प्रेक्षक खूप पसंत करतात, परंतु तुम्हाला हे माहीत आहे का की अमित भट्ट यांना मलिकेमधील ही भूमिका ऑडिशन न करता मिळाली होती ? अमित भट्ट यांनी या गोष्टीचा खुलासा स्वतः एका माध्यमाच्या मुलाखतीत केला होता. त्यांनी सांगितले की तारक मेहता का उल्टा चश्मा मध्ये चंपक चाचा ची भूमिका साकारण्यासाठी मी कोणतेही ऑडिशन दिले नव्हते.
अमित भट्ट यांच्यानुसार, त्यांनी चंपक चाचा च्या भूमिकेसाठी कोणतेच ऑडिशन किंवा मुलाखत दिली नाही आहे. तारक मेहता का उल्टा चश्मा चे निर्माते असित मोदी यांना मालिकेमधील मुख्य अभिनेते दिलीप जोशी यांनी अमित भट्ट यांचे नाव सुचवले होते. यानंतर असित मोदी यांनी अमित भट्ट यांच्यासोबत एका हॉटेलमध्ये भेट घेतली. यादरम्यान या दोघांच्या गप्पा – गोष्टींमध्येच हे ठरले की चंपक चाचा यांची भूमिका अमित भट्ट हेच साकारतील.
तारक मेहता का उल्टा चश्मा मध्ये अमित भट्ट यांची एका वयोवृध्द काकांची भूमिका आहे, परंतु जेवढे वयोवृध्द ते मालिकेमध्ये दिसतात तेवढे ते नाहीत. अमित भट्ट यांना जेव्हा चंपक चाचा ची भूमिका साकारण्याची संधी मिळाली तेव्हा ते मात्र 36 वर्षांचे होते. आता तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेला 12 वर्ष पूर्ण झाली आहेत, परंतु अमित भट्ट यांच्या अभिनयाचे प्रत्येक दिवशी नवीन रंग बघायला मिळत आहेत.
अमित भट्ट यांच्या खाजगी आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर ते उत्तराखंड चे राहणारे आहेत. अमित भट्ट यांच्या पत्नीचे नाव कृती भट्ट आहे. अमित आणि कृती हे जुळ्या मुलांचे आई – वडील आहेत. तारक मेहता का उल्टा चश्मा मध्ये देखील अमित भट्ट यांचे दोन्ही मुले बघितले गेले आहेत. तसेच अमित भट्ट हे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. आपल्या चाहत्यांसाठी काही खास छायाचित्रे व चित्रफिते देखील ते शेअर करतात.