बॉलिवूड ची देसी गर्ल प्रियांका आता हॉलिवूड मध्ये आपल्या अभिनयाने लोकांना वेड लावत आहे. प्रियांका ने हॉलिवूड मध्ये बऱ्याच चित्रपटात काम केले आहे. त्यातील काही हिट ठरले तर काही फ्लॉप परंतु हॉलिवूड कारकिर्दीतील ‘बेवॉच’ या हॉलिवूड चित्रपटाच्या अपयशामुळे तिला काही फरक पडलेला नाही. बेवॉच नंतरही दोन आणखी हॉलीवूड चित्रपट तिला मिळाले आहेत. यातीलच एक चित्रपट म्हणजे ‘Isn’t it romantic?’ ज्या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ची काही छायाचित्रे सोशल मीडियावर बरीच व्हायरल झाली आहेत.
या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ची प्रियंका चोप्राची काही छायाचित्रे समोर आली आहेत. या छायाचित्रांमध्ये दिसत आहे की प्रियांकाने गुलाबी रंगाचा डी प ने क ड्रेस घातला आहे. अभिनेता अॅडम डिव्हिनसुद्धा तिच्या सोबत या छायाचित्रात दिसत आहे, परंतु समोर आलेली छायाचित्रे आश्चर्यचकित करणारी आहेत.
खरं तर त्या चित्रपटात एक सीन असा आहे की, प्रियांका कॉफी टेबलवर बसून काहीतरी खात असते, त्यातील काही तरी पदार्थ प्रियंका चोप्राच्या गळ्यात अडकतो. त्यानंतर अशा प्रकारे अभिनेता अॅडम डेव्हिन तिथे पोहोचुन प्रियंकाला वाचविण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर प्रियंका तिचे प्राण वाचविल्याबद्दल अभिनेता अॅडम डेव्हिन आभार मानते. हा सीन न्यूयॉर्क मधील एका रेस्टोरंट मध्ये शूट करण्यात आला होता. परंतु या सीनचे छायाचित्र मात्र सर्व इंटरनेट वर वायरल झाले आहे.
या चित्रपटात प्रियंका चोप्राने योग दूताची भूमिका केली आहे. प्रियंका आणि अॅडम डेव्हिन सोबत या चित्रपटात रिबेल विल्सन आणि लियाम हेम्सवर्थ सारख्या कलाकारांचीही भूमिका आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन स्ट्रॉस शुल्सन यांनी केले आहे तर चित्रपटाची पटकथा एरिन कार्डिलो, डाना फॉक्स, कॅटी सिल्बरमन आणि पॉला पेल यांनी लिहिली आहे.