देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी केवळ भारतच नव्हे तर संपूर्ण आशियातील श्रीमंत व्यक्ती आहेत.अब्जावधी मालमत्तेचे मालक मुकेश अंबानी केवळ त्यांच्या उत्तम व्यवसायिक दृष्टीनेच नव्हे तर आपल्या जीवनशैलीसाठीही खूप प्रसिद्ध आहेत.
मुकेश अंबानी जगातील सर्वात महागड्या घरांपैकी एक घरात राहतात.या 27 मजल्यावरील लक्झरी घरात सुमारे 600 नोकरदार काम करतात. चला जाणून घेऊया मुकेश आणि नीता अंबानी ह नोकरदार ला किती पगार देता.
सन 2017 च्या एका अहवालानुसार मुकेश अंबानी यांच्या घरात काम करणार्यांचे पगार दरमहा दहा हजार ते दोन लाख रुपयांपर्यंत आहेत. मुकेश आणि नीता अंबानी आपल्या कर्मचार्यांना पगारासह विमा व शिक्षण भत्ता देतात. येथे काम करणारे मुकेश अंबानी यांच्या नोकरांपैकी काही मुले अमेरिकेत शिकत आहेत हे जाणून कोणालाही आश्चर्य वाटेल.
निता अंबानी आणि मुकेश अंबानी यांच्या वाहनचालकांना दरमहा 2 लाख रुपये पगार मिळतो. तथापि, अंबानी कुटुंबाचा ड्रायव्हर बनणे इतके सोपे नाही. त्याला अनेक निकष पाळावे लागतात. नीता आणि मुकेश अंबानी यांच्या वाहनचालकांना पगारासह राहण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. वाहनचालकांव्यतिरिक्त अंबानी कुटुंब शेफचा पगारही लाखोंचा आहे.