रोमॅंटिक सीन करताना आउट ऑफ कंट्रोल झाले होते हे कलाकार, डायरेक्टर कट-कट म्हणत झाले बेजार

सिनेमांमधील रोमॅंटिक किंवा किसींग सीन्स नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. पण जेव्हा शूटींग सुरू असतं तेव्हा हे सीन कसे शूट होतात किंवा एकंदर वातावरण कसं असतं हे जाणून घेण्याचीही प्रेक्षकांची इच्छा असते. मुळात रोमॅंटिक सीन शूट करणं सोपं काम नाही. या अभिनेता – अभिनेत्री दोघेही जरा घाबरलेले असतात. हे सीन शूट करताना काही विचित्र घटनाही घडतात. काही कलाकार डायरेक्टरने सीन कट म्हटल्यावरही सीन सुरूच ठेवतात. अशाच काही घटना आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

टायगर श्रॉफ-जॅकलीन फर्नांडीस – टायगर श्रॉफ आणि जॅकलीन फर्नांडीस यांच्यात ‘फ्लाइंग जट’ सिनेमात एक हॉट सीन होता. हा सीन शूट करताना दोघेही स्टार इतके हरवले की, डायरेक्टरने कट म्हटल्यावरही दोघे बराच वेळ किस करत राहिले होते. हा किस्सा स्वत: सिनेमाचे दिग्दर्शक रेमो डिसुजाने एका मुलाखतीत सांगितला होता.

सिद्धार्थ मल्होत्रा – जॅकलीन फर्नांडीस -अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीससोबत असा किस्सा दोनदा झाला होता. यावेळी तिचा हिरो सिद्धार्थ मल्होत्रा होता. दोघेही जंटलमन सिनेमाचं शूटींग करत होते. यावेळी दोघे डायरेक्टरने कट म्हटल्यावरही किस करताना आउट ऑफ कंट्रोल झाले होते.

रणबीर कपूर – एवलिन शर्मा – असाच काहीसा किस्सा रणबीर कपूर आणि एवलिन शर्मासोबत ‘ये जवानी है दीवाने’ सिनेमातील एक रोमॅंटिक सीन करताना झाला होता. यात त्यांचा किसींग नव्हता, पण रोमॅंटिक सीन होता. यावेळी डायरेक्टर कट म्हटल्यावरही दोघे फार जवळ आले होते.

रुसलान मुमताज – चेतना पांडे – या दोघांचा ‘आय डोन्ट लव यू’ सिनेमा आला होता. हा सिनेमा फार चालला नाही. पण यातील रोमॅंटिक सीनची फार चर्चा झाली होती. या सिनेमातील एक रोमॅंटिक सीन करताना अभिनेता रूसलान मुमताजने चुकून अभिनेत्री चेतना पांडेच्या ड्रेसची झिप उघडलली होती. ज्यानंतर सेटवर एक गोंधळाचं वातावरण झालं होतं.

विनोद खन्ना – माधुरी दीक्षित – माधुरी दीक्षित आणि विनोद खन्ना यांनी ‘दयावान’ सिनेमात एकत्र काम केलं होतं. त्यांच्यातील रोमॅंटिक सीन चांगलाच गाजला होता. हा सीन शूट करताना विनोद खन्ना इतके हरवले होते की, त्यांनी किस करताना माधुरीचे ओठ चावले होते.

विनोद खन्ना – डिंपल कपाड़िया – अभिनेते विनोद खन्ना आणि अभिनेत्री डिंपल कपाडिया यांच्यासोबतही एकदा असाच किस्सा झाला होता. हॉट सीन शूट करताना विनोद खन्ना इतके हरवले होते की, डायरेक्टरने कट म्हटल्यावरही दोघे किस करत राहिले होते.

रंजीत – माधुरी दीक्षित – माधुरीसोबत ही घटना ‘प्रेम प्रतिज्ञा’ सिनेमाच्या शूटींगवेळी घडली होती. यात एक रेप सीनचं शूटींग करताना माधुरी चांगलीच घाबरली होती. ती इतकी घाबरली होती की, तिने अभिनेते रंजीत यांना ताकीद दिली होती की, तिला स्पर्शही करू नये.

दीलिप ताहिल – जयाप्रदा – असाच एक किस्सा अभिनेत्री जयाप्रदा सोबत झाला होता. एका सीनच्या शूटींगवेळी जयाप्रदाला दीलिप ताहिलने इतकं जोरात पकडलं होतं की, तिने त्यांना एक कानशीलात लगावली होती. यामुळे सेटवरील वातावरण एकाएकी शांत झालं होतं.

रेखा – विश्वजित – रेखा आणि विश्वजीत यांच्यातील किसींग सीन चांगलाच गाजला होता. असे सांगितले जाते की, डायरेक्टरने १५ वेळा कट म्हणूनही विश्वजीत रेखाला किस करत राहिले होते. त्यांनी रेखाला घट्ट पकडून ठेवलं होतं. रेखाने कसंतरी स्वत:ला त्यांच्या तावडीतून सोडवलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published.