मित्रांनो बॉलिवूड स्टार शाहरुख खान च्या बॉडीगार्ड रवीसिंगला वर्षासाठी अडीच कोटी पगार धिला जातो. त्याचबरोबर देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आपल्या ड्रायव्हरला वर्षासाठी सुमारे 2.4 कोटी रुपये पगार देतो. शाहरुख आणि अंबानी व्यतिरिक्त बॉलिवूडमधील असे अनेक स्टार आहेत जे आपल्या ड्रायव्हर्स आणि बॉडीगार्डना कोट्यावधी पगार देत आहेत. चला याबद्दल जाणून घेऊया!
शाहरुख खान – बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा बॉडीगार्ड रविसिंग यांना सर्वाधिक पगार मिळतो. किंग खान त्याच्या अंगरक्षक रवीला वर्षाकाठी अडीच कोटी पगार देतो. मुकेश अंबानी – देशाचा सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आपल्या ड्रायव्हरला दरमहा सुमारे 2 लाख रुपये वेतन देते म्हणजेच वार्षिक 2.4 कोटी रुपये देतो. राहण्याची आणि खाण्याची सोय व्यतिरिक्त अंबानी आपल्या कर्मचार्यांना विमा आणि शिक्षण भत्ताही देतात.
सलमान खान-सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा वार्षिक दोन कोटी पगार घेतो. तो केवळ सलमानचा अंगरक्षकच नाही तर जवळचा मित्रही आहे. शेरा 20 वर्ष पासुन सलमानसोबत आहे. आमिर खान – बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानसुद्धा त्याचा अंगरक्षक युवराज घोरपडे यांना वर्षा साठी सुमारे दोन कोटी रुपये पगार देतो. याशिवाय इतर सुविधा वेगळ्या आहेत.
अमिताभ बच्चन – बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन आपला बॉडीगार्ड जितेंद्र शिंदे यांना वर्षा साठी दीड कोटी रुपये मानधन देतात. गेल्या अनेक वर्षांपासून जितेंद्र बिग बीचे संरक्षण करीत आहे. अक्षय कुमारचा – बॉलिवूडमधील सर्वात फिट कलाकारांपैकी एक अक्षय कुमार त्याच्या अंगरक्षक श्रेयसला वर्षाकाठी 1.2 कोटी रुपये मानधन देतो. श्रेयसला इतर सुविधाही मिळतात.
दीपिका पादुकोण – बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण तिचा बॉडीगार्ड जलालला वर्षासाठी जवळपास 80 लाख रुपयांचा पगार देते. दीपिका तिचा बॉडीगार्ड जलालला भाऊ मानते आणि दरवर्षी त्याला राखी बांधते. सैफ आणि करीना – नवाब अभिनेता सैफ अली खान यांचा मुलगा तैमूरची नैनी सावित्री चा महिन्याचा पगार 1.50 लाख आहे. ओव्हरटाईमवर महिन्याला 1.75 लाख रुपये पगार दिला जातो.