महेश भट्ट आणि परवीन बॉबी ही 70 च्या दशकाची दोन नावे आहेत ज्यांची लव्हस्टोरी अजूनही बॉलिवूड कॉरिडॉरमध्ये चर्चेत आहे. त्यावेळी परवीनची मोजणी सर्वात महागड्या अभिनेत्रींमध्ये होत होती. आपल्या फिल्मी करिअरमध्ये परवीनने अनेक हिट आणि जबरदस्त चित्रपट दिले.परवीनने बॉलिवूडमध्येही ग्लॅमरस कपड्यांचा ट्रेंड सुरू केला होता. होय, ती 70 च्या दशकात सर्वात बो ल्ड अभिनेत्री होती.
तिचे चित्रपट कारकीर्द जितके चांगले होते तितके तिचे खरे आयुष्य वाईट होते. आजपर्यंत अभिनेत्रीचा मृत् यू ही एक रहस्यच आहे. तिच्या मृ-त्यूवर बरेच लोक म्हणतात की,ती वेडी होती, तर काहींचा असा विश्वास आहे की अभिनेत्रीनेच मृ-त्यूला मिठी मारली. त्यावेळी महेश भट्ट तिच्या अगदी जवळचा होता, आणि त्यांच्या प्रेमकथेचा अंत अत्यंत धोकादायक व वेदनादायक होता.
परवीन बॉबी रुपेरी पडद्यावर आनंदी दिसत होती. तिच्या वास्तविक जीवनात ती एकटीच होती. परवीनचे अफे अर डॅनी आणि कबीर बेदी यांच्याशीही होते. परंतु तिचे महेश भट्टवर खुप प्रेम होते आणि महेशने आपली पत्नी सोडून अभिनेत्रीबरोबर थेट जगण्यास सुरुवात केली होती,आपल्या प्रेमाचा अंत इतका दुःखद होईल याची कल्पनाही कोणी केली नव्हती.स्वत: महेशने एका मुलाखतीत आपल्या आणि परवीनच्या नात्याबद्दल अशी अनेक रहस्ये उघडकीस आणली होती, जे जाणून घेतल्यावर लोकांना आश्चर्य वाटले.महेशने आपल्या परवीनला श्रद्धांजली वाहण्यासाठी एक चित्रपट देखील बनविला आहे.
महेश भट्ट आणि परवीनचे प्रेम 1977 मध्ये सुरू झाले होते, जेव्हा परवीनची कारकीर्द चांगली चालली होती. दोघांचे प्रेम इतके खोलवर गेले होते की महेश पत्नीला सोडून परवीनबरोबर राहू लागला. परवीन देखील महेशसाठी एक सामान्य मुलगी बनली होती आणि त्यामुळे दोघांच्या नात्याला दोन वर्षे उल्टुन गेली होती.
दोन वर्षे एकत्र राहिल्यानंतर 1979 मध्ये जेव्हा महेश एका रात्री घरी परतला तेव्हा परवीनला पाहिल्यानंतर त्याचे आयुष्य बदलले. वास्तविक, परवीनने घरी चित्रपटाची पोशाख परिधान केले होते आणि एका कोपर्यात चाकू घेऊन बसली होती. परवीनने महेशला पाहताच त्याला गप्प राहण्यास सांगितले. मग म्हणाली- ‘बोलू नकोस, खोलीत कोणीतरी आहे. ते मला मा रण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि मग तिनी अमिताभ बच्चन यांचे नाव घेतले.
परवीनच्या तोंडून अशा गोष्टी ऐकून महेशचे ला आषचर्य वाटले आणि या काळ्या रात्रीने महेश भट्टच्या जीवनात खळबळ उडाली होती. जेव्हा त्याने परवीनला डॉक्टरांना दाखवले तेव्हा त्याला समजले की तिला सिजोफ्रेनिया नावाचा मानसिक आजार आहे.
परवीनच्या आजाराची माहिती मिळताच महेशने तिला उत्तम डॉक्टरांकडे नेले. पण हा रोग परवीनच्या शरीरावर आणि मनावर अशा प्रकारे पसरला होता की, तिला एका बंद खोलीत ठेवण्यात आले होते. ना मीडियासमोर आणले नाही ना लोकांसमोर.प्रकृती बिघडू लागल्याने तिनेही औषधे घेणे बंद केले. गेल्या काही दिवसांत परवीन इतकी एकटी झाली की तिच्याकडे कोणीही येऊ शकत नाव्हते. 56 वयाची झल्यावर तिचे अंथरुणावरुन उठणे कठीण झाले होते.
आश्चर्य म्हणजे परवीन मर ण पावली तेव्हा कुणालाही याची माहिती मिळाली नाही. 20 जानेवारी 2005 रोजी ती म रण पावली,पण पोलिस व इतर लोकांना मृ-त्यू ची बातमी 3 दिवसांनंतर समजली,म्हणजेच तिचा मृ-तदे-ह तीन दिवस खोलीत सडत राहिला. ते देखील जेव्हा तिने दारातून भाकर आणि दूध घेतली नाही, तेव्हा कुणीतरी पोलिसांना माहिती दिली.
मुकेश भट्टने एका मुलाखतीत सुशांतची तुलना परवीन बॉबीशी केली. तो म्हणाला की काही काळापूर्वी सुशांतची जेव्हा त्यानी भेट घेतली तेव्हा त्याला असे वाटले की सुशांत अस्वस्थ आहे आणि परवीनच्या वाटेवर आहे. मला माहित आहे की तो डॉक्टरांकडून उपचार घेत आहे,पण मी इतका जवळ नव्हतो,मला फक्त त्याच्याबद्दल काळजी होती कारण तो खूप हरवला सारखा वाटत होता. मुकेशच्या वक्तव्यावर त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले गेले.