बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी ने नुक्ताच आपला 72 वा वाढदिवस साजरा केला आहे. हेमा मालिनी चा जन्म 16 ऑक्टोबर 1948 रोजी तामिळनाडूच्या अम्मनकडी येथे झाला. 1970 साली हेमा मालिनीने बॉलिवूडमध्ये तिच्या कारकिर्दीची पहिली हिट फिल्म दिली. जॉनी मेरा नाम असे या चित्रपटाचे नाव आहे.
चित्रपटात हेमा मालिनीसोबत अभिनेता देवानंद मुख्य भूमिकेत दिसला होता. बॉलिवूडशिवाय हेमा मालिनी नीही राजकारणात यश मिळवले आहे. ती मथुराची खासदार आहे. तर, आम्ही तिच्या एकूण मालमत्तेबद्दल सांगत आहोत.
हेमा मालिनी ने वर्ष 2019 मध्ये आपली मालमत्ता उघड केली. 2019 च्या लोकसभा निवडणुकांदरम्यान अभिनेत्रींनी प्रतिज्ञापत्रात सांगितले की, गेल्या पाच वर्षा मध्ये तिची संपत्ती 34.46 कोटींनी वाढली आहे.सोबत हेमा मालिनी म्हणाली की तिच्याकडे बंगला, दागिने, रोकड इ आहे.गेल्या काही वर्षांपासून ती दरवर्षी 10 कोटी रुपये कमवते. या प्रतिज्ञापत्रात अभिनेत्रीने आपल्या कारांंविषयीही माहिती दिली.
तिच्याकडे दोन कार असल्याचे हेमा मालिनी म्हणाल्या. ज्यामध्ये मर्सिडीज आहे. ज्याची किंमत 33.62 लाख रुपये आहे. ही कार 2011 मध्ये खरेदी केली गेली होती. दुसरी कार टोयोटा आहे. मात्र, हेमा मालिनीवरही 6.75 कोटींचे कर्ज आहे. याशिवाय प्रतिज्ञापत्रात हेमा नी पती धर्मेंद्रच्या मालमत्तेबद्दलही माहिती दिली.
हेमा म्हणाली की, धर्मेंद्रकडे 123.85 कोटींची संपत्ती आहे. त्याचबरोबर एडीआरनुसार 2019 मध्ये हेमा मालिनी आणि धर्मेंद्र देओल यांची 250 कोटींची मालमत्ता आहे. त्याचबरोबर 2014 ते 2020 या काळात या मालमत्तेत 2 कोटींची वाढ झाली आहे.