दसऱ्या निमित्त अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिजने एका स्टाफ मेंबरला दिली 25 लाखाची भेट!!

दसराच्या निमित्ताने जॅकलिन फर्नांडिजने तिच्या स्टाफ मेंबरला एक खास भेट दिली आहे. जॅकलिनने अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यापासून,तिचा तो स्टाफ मेंबर तिच्यासोबत आहे.दसर्‍याच्या निमित्ताने जॅकलिनने तिच्या स्टाफमधील एका सदस्याला गाडी भेट दिली.जॅकलिन फर्नांडिसने ही कार सरप्राईज म्हणून दिली.जॅकलिनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे.

मुंबई बॉलिवूड सेलेब्सही त्यांच्याबरोबर काम करणार्या स्टाफची खास काळजी घेतात. जॅकलिन फर्नांडिज हे त्याचे ताजे उदाहरण आहे. दसर्‍याच्या निमित्ताने जॅकलिनने तिच्या स्टाफमधील एका सदस्याला गाडी भेट दिली.रिपोर्ट्सनुसार, जॅकलिन फर्नांडिजने ही कार सरप्राईज म्हणून,शूटिंगच्या सेटवर दिली आहे. वास्तविक स्वत: जॅकलिनलाही माहित नव्हतं की गाडी कधी दिली जाणार आहे.

सोशल मीडियावर जॅकलिनचा एक व्हिडिओ समोर आला असून, त्यामध्ये ती गाडीची चावी देताना दिसत आहे. ट्रॅफिक पोलिस इन्स्पेक्टरच्या गणवेशात जॅकलिन दिसली. त्यावेळी ती शूटिंग करत होती,असे समाजते.रिपोर्ट्सनुसार जॅकलिनचा स्टाफ मेंबर तिच्या बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यापासून तिच्यासोबत होता. त्याच वेळी व्हिडिओमध्ये हा स्टाफ मेंबर कारसमोर नारळ फोडत आहे.

जॅकलीनने नुकतेच इन्स्टाग्रामवर चार दशलक्ष फॉलोअर्स पूर्ण केले. यावेळी अभिनेत्रीने टॉपलेस फोटो शेअर केले. फोटोमध्ये जॅकलिनने फोटोंमध्ये पांढरा पेंट घातला आहे आणि वर कुठल्याही कपड्यांशिवाय दिसत आहे.

जॅकलिन फर्नांडिसचे घर खूपच सुंदर आहे,जॅकलिन नेपोटिझमच्या विरोधात नाहीत, असं बॉलिवूडला तिने सांगितलं.वर्कफ्रंटबद्दल बोलताना, जॅकलिन फर्नांडिज शेवटी ड्राइव्ह चित्रपटात दिसली होती. या सिनेमात तिच्या विरुद्ध सुशांतसिंग राजपूत होते. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. आता जॅकलिन किक या चित्रपटाच्या सिक्वल किक 2 मध्ये दिसू शकते.

किक 2 व्यतिरिक्त जॅकलिन रणवीर सिंगसोबत सर्कस आणि जॉन अब्राहमच्या ‘अटॅक’ या चित्रपटातही काम करत आहे. त्याचबरोबर अभिनेत्री भूत पोलिस चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटात जॅकलीनसह सैफ अली खान, अर्जुन कपूर आणि यामी गौतम मुख्य भूमिकेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.